#5 मोठ्या बातम्या : डोकलाम उत्तरेवर चीनचा कब्जा?

डोकलाम उत्तरेकडील भागावर चीननं कब्जा केल्याची माहिती समोर येते आहे. डोकलामच्याच मुद्यावरून भारत-चीन संबंध दुरावले होते. या अर्थाचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे.

1. डोकलामवर चीनचा कब्जा

चीनने संवेदनशील डोकलाममधील उत्तरेकडच्या भागावर वर्चस्व मिळवल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्रानं दिलं आहे. उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांनुसार हे स्पष्ट झालं आहे, अशी बातमी इकॉनॉमिक टाईम्सनं दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोकलामच्या मुद्यावरून भारत आणि चीनचे संबंध ताणले गेले आहेत.

हत्यारांनी सज्ज चीनची वाहनं या प्रदेशात सज्ज असल्याचंही स्पष्ट झालं आहे. रस्ते बनवण्यासाठीची सामुग्री मोठ्या प्रमाणात तयार असल्याचं दिसत आहे. याच महिन्यातली ही छायाचित्रं आहेत, असं बातमीत म्हटलं आहे.

गेल्या वर्षी डोकलामध्ये रस्ता तयार करण्याच्या मुद्यावरून भारत-चीन संबंध तीन महिन्यांहून अधिक काळ ताणले गेले होते. चीनचं सैन्य याप्रदेशात सुसज्ज असल्याचंही समजतं आहे.

दरम्यान भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी भारतीय सैनिक याप्रदेशात तैनात असल्याचं सांगितलं. चीनने हल्ला केला तर प्रत्युत्तर दिलं जाईल. डोकलाम परिसरात चीननं केलेलं बांधकाम हंगामी स्वरुपाचं आहे, असं लष्करप्रमुख म्हणाल्याचं वृत्त आहे.

2. अनाथांना खुल्या वर्गातून आरक्षण

राज्यातील अनाथ मुलांचं पुनर्वसन आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अशा मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण दिलं जाणार आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

लोकसत्ताने यासंदर्भात बातमी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनाथ मुलांना संस्थेतील आश्रयाचा कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. प्रवर्ग निश्चित नसल्यानं सामाजिक सवलती किंवा लाभांपासून त्यांना वंचित रहावं लागतं.

3. मुंबईमध्ये पोलिसांना 8 तासांची डयुटी

Image copyright PUNIT PARANJPE/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा मुंबई पोलिसांची ड्युटी आता 8 तासांची असणार आहे.

रात्रंदिन मुंबईकरांच्या सेवेत असणारे मुंबई पोलीस आता ऑन ड्युटी आठच तास कामावर असतील. शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षकांसाठी सुरू करण्यात आलेला मिशन 8 तास हा उपक्रम सर्व पोलीस ठाण्यात लागू करण्यात आल्याची घोषणा बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केली. लोकमतने यासंदर्भात बातमी दिली.

4. प्रकल्पग्रस्तांना मिळणार चौपट मोबदला

राज्यात यापुढे सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित केल्यास, त्याबद्दल बाजारभावाच्या चारपट मोबदला देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 2013च्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्यास राज्य मंत्रीमंडळाने बुधवारी मान्यता दिली. रस्ते, पूल, धरणं, गृहनिर्माण प्रकल्प अशा कोणत्याही सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारनं

5. 70 वस्तू सेवांवरील जीएसटी होणार कमी?

Image copyright ARUN SANKAR/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा आणखी काही वस्तू आणि सेवांकरील कर कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता वाढत असतानाच आणखी 70 वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचा दर कमी केला जाण्याचे संकेत आहेत. लोकमतनं यासंदर्भात बातमी दिली आहे. यात 40 सेवा आणि कृषीशी संबंधित काही वस्तूंचा समावेश असेल.

करनिर्धारण समितीने करकपातीची शिफारस केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील गुरुवारी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 15 दिवसात सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)