मुंबई मॅरेथॉन : काही रंगतदार आणि अर्थपूर्ण क्षणचित्रं

या मॅरेथॉनमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. छायाचित्रात मंदिरा बेदी दिसत आहे. Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा या मॅरेथॉनमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. अभिनेत्री, अँकर मंदिरा बेदीदेखील मॅरेथॉनमध्ये धावली.

मुंबई आंतररष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये यंदा इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. भारतीय महिलांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धावपटूंनी खणखणीत यश मिळवलं.

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेची चाचणी असतेच, शिवाय या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून एखादा चांगला संदेश देणारे उत्साही धावपटूही दिसतात. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिकचा धोका, लोकसंख्यावाढीचा धोका, मातृभाषा हरपण्याचा धोका सांगायचा प्रयत्न झाला तर बेटी बचाओसारखे संदेशही देण्यात आले. पुरुष हक्क, पुरुषांचं आरोग्य याविषयी सांगणारं एक चित्रही लक्ष वेधून घेत होतं.

Image copyright Rahul Ransubhe/
प्रतिमा मथळा पुरुष हक्क, पुरुषांचं आरोग्य याविषयी सांगणारं एक चित्र मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधून घेत होतं.

मुंबईमध्ये झालेल्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये जगभरातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनची काही कलरफुल क्षणचित्रं.

मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आफ्रिकन धावपटूंनी वर्चस्व राखलं. भारतीय महिलांच्या स्पर्धेत मात्र मराठी मुलींनी यश मिळवलं.

गट प्रथम द्वितीय तृतीय
एलिट मॅरेथॉन (पुरुष) सॉलोमन डेक्सिसा (इथियोपिया) वेळ - 2 : 09 :: 34 शुमेट अकालन्यू (इथियोपिया) 2 : 10 :: 01 जोशुका किपकोरि (केनिया)2 : 10 :: 30
एलिट मॅरेथॉन (महिला) अमानी गोबेना (इथियोपिया) वेळ -2 : 25 :: 50 बोर्नेस किटूर (केनिया)2 : 28 :: 48 शुको जेनेमो (इथियोपिया)2 : 29 :: 42
एलिट मॅरेथॉन (भारतीय पुरुष) गोपी थोनाकल नितेंद्रसिंह रावत स्रीनू बुगथा
एलिट मॅरेथॉन (भारतीय महिला) : सुधा सिंग ज्योती गवते पारुल चौधरी
हाफ मॅरेथॉन (पुरुष) प्रदीपकुमारसिंग चौधरी शंकरपाल थापा दीपक कुंभार
हाफ मॅरेथॉन (महिला) संजीवनी जाधव मोनिका आथरे
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा ऐतिहासीक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी झालेले धावपटू.
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा पहाटे 5.45 वाजता मॅरेथॉनला सुरुवात झाली.
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे यांनी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलं. संजीवनी प्रथम तर मोनिका द्वितीय क्रमांकावर होती.
Image copyright Rahul ransubhe
प्रतिमा मथळा मोनिका आथरे
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा लोकसंख्या वाढ रोखण्याचा संदेश देणारा धावपटू
Image copyright Rahul ransubhe
प्रतिमा मथळा हाफ मॅरेथॉनमध्ये प्रथम आलेली संजीवनी जाधव
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा मातृभाषा जपा असा संदेश देणारी धावपटू.
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा 'बेटी बचाओ'चा संदेश देण्यासाठी एका कुटुंबानं मॅरेथॉनमध्ये अशी वेषभूषा केली होती.
Image copyright RAHUL RANSUBHE/BBC
प्रतिमा मथळा प्लॅस्टिकचा भस्मासूर किती भयानक ठरू शकतो हा संदेश देणारा हा धावपटू अशी बोलकी वेषभूषा करूनच रस्त्यावर उतरला होता.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)