जर्मन म्युझिक अल्बममध्ये ठाण्यातल्या शाळकरी मुलांचं गाणं

जर्मन म्युझिक अल्बममध्ये ठाण्यातल्या शाळकरी मुलांचं गाणं

ठाण्यातल्या मुलांनी एका जागतिक स्पर्धेसाठी जर्मन गाण्याची निर्मिती केली. 400 गाण्यांमधून त्यांच्या या गाण्याची निवड एका आंतरराष्ट्रीय अल्बमसाठी झाली आहे.

'इश बिन इश्' हे युरो स्कूलच्या सातवी आणि आठवीतल्या मुलांनी लिहिलेलं आणि बसवलेलं गाणं जर्मनीतल्या एका आंतरराष्ट्रीय अल्बममध्ये समाविष्ट झालं आहे.

एंगेजमेंट ग्लोबल या उपक्रमा अंतर्गत जर्मन फेडरल प्रेसिडेंट यांनी काही महिन्यांपूर्वी एक स्पर्धा जाहीर केली होती. यात 'आईनं वेल्ट' म्हणजेच वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेवर आधारित गाणं रेकॉर्ड करून पाठवायचं होतं.

आणि जगभरातून निवडलेल्या 23 गाण्यांचा एक अल्बम या उपक्रमा अंतर्गत काढण्यात येणार होता. एकूण 400 प्रवेशिकांमध्ये आशियातून एकमेव गाण्याची निवड झाली आहे. आणि तो मान इश बिन इश ला मिळाला आहे. 'इनोसन्स' शालेय बँडने या गाण्याची निर्मिती केली आहे. 9 मुली आणि एक मुलगा या बँडमध्ये आहेत.

नुकतीच युरो स्कूलची ही मुलं जर्मनीत जाऊन या गाण्याचं रेकॉर्डिंगही करून आली. यावर्षअखेरीला हा अल्बम प्रकाशित होणार आहे.

व्हीडिओ- ऋजुता लुकतुके, शूट - राहुल रणसुभे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)