ट्रंप-रशिया यांचा जांगडगुत्ता आहे तरी काय?

अमेरिका, शीतयुद्ध, रशिया, आंतरराष्ट्रीय संबंध. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रशियाच्या मुद्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारकार्दीत रशिया नेहमीच अडचणीचं ठरलं. त्याचीच सर्वाधिक चर्चाही झाली आहे.

थोडक्यात,

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं ट्रंप यांची साथ दिल्याचा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारात संगनमत केलं होतं का? याची चाचपणी विशेष वकील करत आहेत.

काही पुरावा?

ट्रंप यांच्या निवडणूक मोहिमेतील वरिष्ठ सदस्य रशियाच्या अधिकाऱ्यांना भेटले.

या बैठकीचा तपशील सुरुवातीला जाहीर करण्यात आला नव्हता.

Image copyright Getty Images

या बैठकांत काय झालं?

डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी रशियाचे राजदूत आणि त्यांची भेट झाली होती. या भेटीविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी एफबीआयला खोटी माहिती दिली. फ्लिन यांनी पुराव्याशी छेडछाड केली असल्याच्या आरोपांना यामुळे खतपाणी मिळालं.

डोनाल्ड यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर आणि रशियाचे वकील यांची निवडणूक प्रचारादरम्यान भेट झाली. आपल्याकडे हिलरी क्लिंटन यांना अडचणीत आणेल, अशी माहिती होती असा त्या वकिलाचा दावा होता. रशियाशी असणाऱ्या तथाकथित संबंधाविषयी ट्रंप यांचे सल्लागार जॉर्ज पापाडोपौलुस यांनी एफबीआयला खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे.

याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग?

ट्रंप यांचे जावई जेराड कुश्नर हेही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख पॉल मॅनफर्ट यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे. अर्थात, या आरोपांचा आणि निवडणुकांचा थेट संबंध नाही.

आणि ट्रंप?

याप्रकरणाचा तपास करणारे प्रमुख अधिकारी, एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोम्ये यांची ट्रंप यांनी पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे हा न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु विधितज्ज्ञांमध्ये याबाबत मतमतांतरं आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)