श्रीनगरमध्ये हॉस्पिटलवर कट्टरतावाद्यांचा हल्ला

KASHMIR Image copyright Getty Images

श्रीनगरमधल्या एका हॉस्पिटलवर कट्टरतावाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. त्यात एक पोलीस ठार झाला आहे.

जम्मू आणि काश्मिरचे डीआईजी गुलाम हसन बट यांनी श्रीनगरमध्ये स्थानिक पत्रकार माजिद जहांगीर यांना सांगितलं की, "श्रीनगरच्या एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी एका पाकिस्तानी कट्टरतावाद्याला उपचारासाठी आणलं होतं. त्याचवेळी हॉस्पिटलवर कट्टरतावाद्यांनी हल्ला केला. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कट्टरतावाद्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर हा हल्ला झाला."

भारत प्रशासित काश्मिरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अटकेत असलेला कट्टरतावादी फरार झाला आहे.

फरार कट्टरतावाद्याचं नाव नावेद जाट आहे. त्याला गेल्या वर्षी दक्षिण काश्मिरमधल्या शोपिया जिल्ह्यातून अटक करण्यात आलं होतं.

या घटनेनंतर, श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Image copyright TAUSEEF MUSTAFA/AFP/GETTY IMAGES

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)