पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या गाडीला अपघात

जशोदाबेन Image copyright IPMR
प्रतिमा मथळा जशोदाबेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या गाडीला राजस्थानमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात सुरक्षारक्षकही गंभीर जखमी झाला आहे. जशोदाबेन सुरक्षित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Image copyright IPMR

चित्तौड कोटा फोर लेन महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघाताची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चित्तौड जिल्ह्यातल्या काटूंदा या पोलीस स्थानकापासून 45 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला.

या अपघातात बसंग भाई नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं पारसोलीचे पोलीस अधिकारी श्याम सिंह यांनी बीबीसीला सांगितलं.

Image copyright IPMR

"अपघात कसा घडला याची चौकशी सुरू आहे. तसंच जखमींना उपचारासाठी चित्तौडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे," असं सिंह यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)