मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या प्रसादाची गोष्ट

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैदी अहोरात्र मेहनत घेऊन अंबाबाईच्या भक्तांसाठी लाडू बनवतात. दररोज कमीत कमी 3,000 ते 5,000 लाडू इथं बनवले जातात. तर नवरात्रोत्सवात दररोज किमान 20,000 ते 25,000 लाडूंची विक्री होते.

कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी या उपक्रमाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, केद्यांकडून प्रसादाचे लाडू बनवण्याला सुरवातीला विरोध झाला. पण आता भाविकांकडून याचं कौतूक होत आहे.

कैद्यांना रोजगार मिळत असल्यानं कारागृहात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला. यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे, ते त्यांनी सांगितलं.

शुटींग : स्वाती पाटील राजगोळकर

एडिटींग आणि निर्मिती : गणेश पोळ

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)