पाहा व्हीडिओ : रंगीबेरंगी झोपडपट्टी पाहिलीये का कधी?

पाहा व्हीडिओ : रंगीबेरंगी झोपडपट्टी पाहिलीये का कधी?

मुंबई येथील असल्फा वस्तीतील डोंगराचं सध्या रुप पालटलं आहे. या डोंगराच्या माथ्यापर्यंत असलेली सर्व घरे नव्या नवरीप्रमाणे नटली आहेत. विविध रंगांनी रंगवलेली ही घरे जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.

या प्रकल्पाची माहिती देताना चल रंग दे ची संस्थापक देदिप्या रेड्डी म्हणाल्या की, "या सर्व उपक्रमाचा मुळ उद्देश म्हणजे, लोकांचं झोपडपट्टीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलणे, त्यांची मानसिकता बदलणे हा होता"

याबद्दल सांगताना येथील रहिवासी प्रियंका फाळके म्हणाल्या, "आता जे पेंटींग केले आहे ते आम्ही तसेच ठेवू. आम्हाला असं वाटतंय की हे स्वच्छ रहावं. कायम स्वरूपी असंच रहावं, जसं आज आहे पुढेही तसंच रहावं. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू."

शूटींग आणि एडिटींग - राहुल रणसुभे

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)