पाहा व्हीडिओ : कंजारभाट समाजातील तरुणांचा कौमार्यचाचणीविरुद्ध एल्गार

पाहा व्हीडिओ : कंजारभाट समाजातील तरुणांचा कौमार्यचाचणीविरुद्ध एल्गार

कंजारभाट समाजातील कौमार्यचाचणीच्या प्रथेविरोधात विवेक तमाईचिकर आणि प्रशांत इंद्रेकर यांच्यासारखे तरुण समाजातल्या लोकांशी संवाद साधत आहेत.

कंजारभाट या समाजात पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा आहे. तसंच जातपंचायतीच्या प्रत्येक बैठकीच्या वेळी संबंधित कुटुंबांना आर्थिक रक्कम भरावी लागते.

अशा प्रथांविरोधात याच समाजातील तरुणांनी अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून Stop The V Ritual हा व्हॉट्सअप ग्रुपही तयार केला आहे.

पिंपरीमधील कंजारभाट समाजाच्या एका लग्नसमारंभात काही दिवसांपूर्वी जातपंचायतीमधील वादातून मारहाणीची घटना घडली होती.

शुटिंग आणि एडिटिंग- शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)