सोशल : महिलांचा मनोहर पर्रिकरांवर 'बीअर हल्ला'

मनोहर पर्रिकर

फोटो स्रोत, Reuters

महिलांचं खाणंपिणं, कपडे आणि बोलणं-चालणं यावर नेहमीच भाषणबाजी होत असते. आता महिलांच्या बीअर पिण्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू असून #GirlsWhoDrinkBeer ट्रेंड जोरात सुरू आहे.

याच कारण आहे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं एक भाषण.

गोव्यात शुक्रवारी आयोजित स्टेट युथ पार्लंमेंटमध्ये पर्रिकर यांचं भाषण झालं होतं. त्यात ते म्हणाले होते, "त्यांना आता भीती वाटत आहे कारण मुलीसुद्धा बीअर पिऊ लागल्या आहेत आणि सहनशीलतेची सीमा ओलांडली जात आहे."

तरुणांतील व्यसनांबद्दल ते बोलत होते.

त्यानंतर अनेक महिलांनी ट्वीटरवर बीअरसह फोटो टाकून पर्रिकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

फोटो स्रोत, Milind Jog/Facebook

मिलिंद जोग म्हणतात, "बीअरवरील सर्व कर माफ केले जावेत. हे उत्तम पेय असून तुमच्या आरोग्यासाठी चांगल आहे."

भक्ती तांबे म्हणतात, "शनिवारी रात्री मी डाळींब, लिंबू चहा घेत आहे. मिस्टर पर्रिकर तुम्ही खूश आहात का?"

निशिता गौतम लिहितात, "मिस्टर पर्रिकर गोव्यातून चीअर्स. चला मुलींनो हा वीकेंड गंमतीदार बनवू."

वीना वेणुगोपाल लिहितात, ''#GirlsWhoDrinkBeer मी माझ्या वडिलांसमवेतही पिते.'' तर शिखा लिहितात, "मिस्टर पर्रिकर मी तुमची भीती पाहू शकते..."

एनआरकेने लिहिलं आहे की, "कधीकधी माझ्या वडिलांसमवेतही.."

तर फिल्ममेकर विवेक अग्निहोत्रीने ट्वीट केलं आहे की, "ही खरी मुलगी आहे. ती सेल्फी गॅंगची नकली स्त्रीवादी नाही."

सीमा गोस्वामी लिहितात, "फक्त बीअरवरच का थांबायचं, डीअर लेडीज? सगळं प्या."

प्राची लिहितात ''#GirlsWhoDrinkBeer जे नेते अजूनही पोगो पाहतात आणि गोमूत्रवर गोंधळ घालतात, त्यापेक्षा चांगल्या आहेत."

काहींनी पर्रिकर यांचं समर्थनही केलं आहे. रोहन शिंदे लिहितात, "#GirlsWhoDrinkBeer वर प्रतिक्रिया पाहिल्या. पण लोक विसरत आहेत की पर्रिकर सभ्य व्यक्ती आहेत. तरुणांतील वाढत्या व्यसनांबद्दल त्यांनी फक्त चिंता व्यक्त केली होती."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)