सोशल : 'सेना-भाजपची आता जोडी कुठे आहे. तुझं माझं ब्रेक-अप झालं ना?'

सेना-भाजप Image copyright Getty Images

सरकारमध्ये असल्यानं सरकारविरोधात आंदोलन करायचं नाही, असं कुणीही सांगितलेलं नाही. जनतेची कामं होत नसतील तर सरकारचे कान उपटले पाहिजेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम करावं, त्यासाठी गरज पडल्यास आक्रमक व्हावं, आंदोलन करावं असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनाभवनात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

2019ची निवडणूक आपण स्वबळावर लढवणार अशी घोषणाही शिवसेनेनं केली आहे. त्यांच्यात सतत उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला होता की, 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्तानं सेना-भाजपच्या जोडीला काय सल्ला द्याल?

वाचकांनी यावर मजेशीर आणि खुसखुशीत प्रतिक्रिया दिल्या. त्यातल्याच या प्रातिनिधिक.

विजय सबनीस म्हणतात, "शिवसेनेनं कितीही टीका केली तरी भाजप फारसं उत्तर देत नाही. दोघांचा व्हॅलेंटाईन डे करार आहे की, एकमेकांच्या वोट बॅंक्स राखायच्या."

Image copyright Facebook

"एकत्रितपणे सुखाचा संसार करायचा असेल तर दोघांनीही एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. नाहीतर एक घाव दोन तुकडे करुन ब्रेक अप करा," असा सल्ला दिलीप गांधी यांनी दिला आहे.

संदीप पाटील यांना वाटतं की, "सेना-भाजपची कुरबूर म्हणजे पेल्यातलं भांडण आहे."

Image copyright Facebook

"आता जोडी कुठे आहे. तुझं माझं ब्रेक-अप झालं ना?" असा मिश्कील प्रश्न विचारला आहे आदित्य गोडसे यांनी.

संदिप फडतरे म्हणतात, "दोघांनी बसून मन लावून नीट अभ्यास करून शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे वाट कशी लावायची ते ठरवा."

Image copyright Facebook

किशोर भोसले आणि मनोहर बोडके यांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "सेना-भाजपचं तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असं आहे."

Image copyright Facebook

"सरकारवर विरोधी पक्षापेक्षा शिवसेनेचाच जास्त वचक आहे," असं मत रूपेश तळे यांनी व्यक्त केलं आहे.

तर दत्तात्रये कामठे म्हणतात, २०१९ नंतर घरी बसल्यावर काय करायचं ?

Image copyright Facebook

मकरंद ननावरे यांनी सरळ सल्ला दिला आहे, "Move on".

Image copyright Facebook

"जरा सुधारा आणि एकमेकांवर आरोप करू नका," असा समजुतीचा सल्ला हर्षित कंटाळे यांनी दिला आहे.

रूपचंद महाजनही याच मताचे आहेत. ते लिहितात, "दोघे एकत्र या आणि चांगला महाराष्ट्र घडवा."

Image copyright Facebook

शिवसेना-भाजपची युती 1989मध्ये झाली. त्यानंतर 2014पर्यंत जवळपास 25 वर्षं त्यांची नातं सुरळीत होतं. 2014 नंतर मात्र त्यांच्यात खटके उडायला लागले आहेत.

आता तर त्यांच्यातलं नातं जवळपास संपुष्टात आल्यासारखंच आहे. त्या पार्श्वभूमीवर, गौरव नाईकर म्हणतात, "जनतेने मध्यस्थी करून यांना घरी पाठवा."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)