पाहा व्हीडिओ : आपली बँक विविध सेवांसाठी वसूल करत असते पैसे. कुठल्या सेवेसाठी किती पैसे ते बघूया.

पाहा व्हीडिओ : आपली बँक विविध सेवांसाठी वसूल करत असते पैसे. कुठल्या सेवेसाठी किती पैसे ते बघूया.

पैशाची गोष्टमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत बँकेकडून मिळणाऱ्या सेवा आणि त्याच्या बदल्यात बँक आकारत असलेल्या फी बद्दल.

आपण बँकेतून पैसे काढले तर लगेच आपल्याला बँकेकडून एक एसएमएस येतो. नुकताच झालेला व्यवहार आणि त्यानंतर खात्यात शिल्लक असलेली रक्कम लगेच लिहून येते. बँकेची ही सुविधा आहे नक्कीच उपयोगी पडणारी. पण त्यासाठी अनेकदा बँक तुमच्याकडूनच फी वसूल करत असते. ही सुविधा सगळ्याच बँकेत मोफत नसते. अशा आणखी अनेक सेवा आहेत ज्यासाठी मासिक किंवा तिमाही फी तुम्ही भरत असता. अशा कुठल्या सेवा आहेत ज्यासाठी बँका फी घेतात. आणि ही फी कशावरुन ठरते, याचा घेतलेला हा आढावा.

निवेदक - ऋजुता लुकतुके, शूट एडिट - निमित वत्स, निर्माती - सुमिरन कौर

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)