पाहा फोटो - दिंड्या-पताका अन् ढोल-ताशे : शिवजयंतीचा राजधानी दिल्लीतही डंका!

शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा शिवजयंतीची मिरवणूक

राजधानी नवी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच शिवजयंतीनिमित्त एका भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दिंडी पताका, ढोल ताशांनी रंगलेल्या या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रं.

भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून एका मिरवणुकीचं आयोजन केलं होतं.

शिवजयंती Image copyright Niranjan Chhanwal/ BBC
प्रतिमा मथळा दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात शिवजयंतीचा कार्यक्रम.
शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा शिवजयंतीनिमित्त सदनात जमलेले मावळे
शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा शिवजयंतीच्या कार्यक्रमात खास पुण्याहून ढोलताशा पथक आलं होतं.
शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा अनेक वेगवेगळे पथक या मिरवणुकीत सामील झाले होते.
शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा आणि या मिरवणुकीत काही शाळकरी मुलांचाही सहभाग होता.

नवी दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी मार्गावर स्थित महाराष्ट्र सदनातून मिरवणुकीला सुरुवात झाली.

शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरून मिरवणुकीला सुरुवात झाली.

तिथून दिंडी पताकांनी सजलेली ही मिरवणूक पुढेच इंडिया गेट रिंगणाजवळ स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत काढण्यात आली.

शिवाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजी राजे
प्रतिमा मथळा शिवाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजी राजेंच्या भूमिकेत मिरवणुकीत सहभागी कलाकार
शिवजयंती Image copyright Niranjan Chhanwal/BBC
प्रतिमा मथळा केवळ ढोल-ताशा आणि मावळेच नव्हे तर हत्ती-घोड्यांचा फौजफाटाही या मिरवणुकीची शान वाढवत होता.
शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
प्रतिमा मथळा मल्लखांबवरच्या कसरती करताना तरुण

संपूर्ण महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त दिल्लीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

शिवजयंती Image copyright Shrikant Bangale/BBC
मावळे कलाकार Image copyright Shrikant Bangale / BBC
प्रतिमा मथळा मावळे कलाकार

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचं थीमही शिवराज्याभिषेकच होता.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
प्रजासत्ताक दिनाचा महाराष्ट्राचा चित्ररथ

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)