EXCLUSIVE व्हीडिओ : मुंबई-पुणे हायपरलूप विषयी सांगत आहेत रिचर्ड ब्रॅन्सन

EXCLUSIVE व्हीडिओ : मुंबई-पुणे हायपरलूप विषयी सांगत आहेत रिचर्ड ब्रॅन्सन

"येत्या 6-7 वर्षांत लोकांना हायपरलूपचा चमत्कार बघायला मिळेल, असा मला विश्वास आहे," असं वर्जिन हायपरलूप वनचे चेअरमन रिचर्ड ब्रॅन्सन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्र सरकारनं व्हर्जिन हायपरलूप या कंपनीसोबत मुंबई आणि पुणे शहरांना जोडण्यासाठी हायपरलूपच्या उभारण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेत करार केला आहे. यानिमित्त बीबीसीचे प्रतिनिधी समीर हाश्मी यांनी रिचर्ड ब्रॅन्सन यांच्याशी बातचीत केली.

हायपरलूप उभारणीच्या खर्चासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, "हायपरलूपचं प्रवासभाडं कुठल्याही हायस्पीड ट्रेनएवढंच असेल. कारण याला हायस्पीड ट्रेनपेक्षाही कमी खर्चात उभारण्याचा आमचा मानस आहे."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)