सोशल : 'मुख्यमंत्री होण्यासाठी संरक्षण मंत्रिपद सोडणाऱ्या पवारांनी हे म्हणावं?'

फेसबुक Image copyright Facebook

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात प्रदीर्घ मुलाखत घेतली. जागतिक मराठी अकादमीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शरद पवारांनी अनेक महत्त्वाची राजकीय विधानं केली.

याच मुलाखतीत 'राज्यापेक्षा देशाचा विचार केल्याची झळ राज्याला बसली' असं विधान त्यांनी केलं. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, शरद पवारांच्या या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं?

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया .

सचिन कडू म्हणतात की, "शरद पवारांनी असं विधान करणं म्हणजे आश्चर्य आहे. जो माणूस राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतो, त्यांच्या तोंडी तरी असं वाक्य शोभत नाही."

Image copyright Facebook

"शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषिमंत्रीपद भूषवलं आहे, त्यामुळे त्यांचं मत संयुक्तिक आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. तरीही त्यात आपण 100 टक्के दिलं नाही असं त्यांना वाटू शकतं," असं मत मांडलं आहे दीपक चौगुले यांनी.

Image copyright Facebook

"शरद पवारांचं म्हणणं बरोबर आहे. दक्षिणेकडची राज्य बघा, आधी स्वतःचा विचार करतात आणि मग देशाचा," असं म्हटलं आहे जगदीश निकम यांनी.

Image copyright Facebook

किशोर भोसले यांनी खोचक प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, "आता काय वेगळ्या महाराष्ट्र देशाची मागणी करता का?"

Image copyright Facbook

सुमीत दांडगे लिहितात, "देशापेक्षा राज्याचा विचार करा. राज्यापेक्षा स्वजातीचा विचार करा आणि शेवटी स्वतः तसंच आपल्या अपत्यांचा विचार करा हीच यांची विचारसरणी आहे."

Image copyright Facebook

प्रवीण विभुतेंना मात्र शरद पवारांचं म्हणणं पटतं. ते लिहितात, "सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्र भरतो. देशानं कधी महाराष्ट्राचा विचार केलाय का?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)