सोशल : लष्करप्रमुखानं राजकारणात हस्तक्षेप करणं चुकीचं

फेसबुक Image copyright Getty Images

आसाममध्ये AIUDF हा पक्ष भाजपपेक्षा जास्त वेगानं वाढतोय, असं विधान लष्करप्रमुखांनी केल्यानंतर वाद निर्माण झालाय.

पक्षाध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी हे विधान राजकीय असल्याचा आरोप केला आहे. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत राजकारणात ढवळाढवळ का करत आहेत, असा प्रश्न ओवेसींनी विचारलाय. तर हे विधान राजकीय नसल्याचा दावा लष्करानं केला आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, लष्करप्रमुखांचं हे विधान तुम्हाला राजकीय वाटतं का? वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

सुदर्शन व्यवहारे म्हणतात, "लष्करप्रमुखानं राजकारणात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. लष्करप्रमुखांची अशीच वक्तव्य येत राहिली तर भारताच पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही."

Image copyright Facebook

"लष्करप्रमुखांचं वक्तव्य राजकीय नसून सामाजिक आहे. आणि समाजात चालू असणाऱ्या घडामोडींवर बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे," असं मत व्यक्त केलं आहे अशोक काकडे यांनी.

Image copyright Facebook

हर्षल ठाकूर लिहितात, "लष्कराचा राजकारणातील हस्तक्षेप हानिकारकच असतो. हाच हस्तक्षेप पुढे जाऊन लोकशाहीला बाधक ठरतो. लष्करी क्रांती झालेल्या देशांचा इतिहास याला साक्ष आहे."

Image copyright Facebook

"लष्कर प्रमुखांनी अशी विधानं करण चुकीचं वाटतं. एखादी संस्था, व्यक्ती किंवा पक्ष यांच्याविषयी देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित माहिती त्यांच्याकडे असली तर त्यांनी ती संबंधित एजन्सीकडे गोपनीयरित्या दिली पाहिजे," असं मत रवींद्र दारके यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

अमोल पाटील यांचं मत मात्र थोडं वेगळं आहे. "आसाममधे पसणारा हा इस्लामिक पक्ष भविष्यात देशाला धोका निर्माण करू शकतो असं बिपिन रावतांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी योग्यच केलं."

Image copyright Facebook

मंगेश गाऱ्हेवार लिहितात की, "राष्ट्रवादाच्या नावाखाली लष्करप्रमुखांचं वक्तव्य खपूनही जाईल. पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो असं व्हायला नको."

Image copyright Facebook

संजय राजपूत म्हणतात, "त्यांचं विधान राजकीय आहे की नाही ते माहित नाही. पण ते जे बोलले ते 100 टक्के खरं आहे. त्यांनी वस्तुस्थिती मांडली."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)