श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या प्रेमाची हळवी किनार

श्रीदेवी आणि बोनी कपूर Image copyright TWITTER/SRIDEVI BONEY KAPOOR
प्रतिमा मथळा श्रीदेवी आणि बोनी कपूर

अभिनेत्री श्रीदेवी यांचं गेल्या वर्षी दुबईत निधन झालं. त्यांच्यासोबत त्यांचे जीवनसाथी बोनी कपूर आणि कुटुंबीय होते. मिस्टर इंडियाच्या निर्मितीच्यावेळी दोघांत झालेल्या ओळखीच रूपांतर नंतर प्रेमात झालं. या प्रेमाला एक हळवी किनारही आहे. ती म्हणजे बोनी कपूर यांनी कठीण काळात दिलेली साथ होय.

मिस्टर इंडिया सिनेमाची निर्मिती सुरू व्हायची होती. त्यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. लेखक जावेद अख्तर आणि निर्माते बोनी कपूर या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन चेन्नईमध्ये गेले. त्यांनी श्रीदेवी यांच्या घरी फोन केला. पण त्या व्यस्त असल्याने काहीवेळ प्रतीक्षा करावी लागेल, असं निरोप श्रीदेवींच्या आईंनी दिला.

पण 3 ते 4 दिवस झाल्यानंतरही श्रीदेवींकडून कोणताच निरोप न आल्याने जावेद अख्तर यांना वाईट वाटू लागलं होतं. तर बिग बजेट सिनेमा बनवण्याच्या तयारीने आलेले बोनी कपूर चिंतातूर झाले होते.

त्यानंतर बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या बंगल्यांवर रोजच चकरा मारू लागले होते. तब्बल दहा दिवसांनंतर श्रीदेवींना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. बोनी कपूर यांनी त्यांना सिनेमाची कथा ऐकवली. ही कथा श्रीदेवींना फारचा आवडली आणि त्यांनी मिस्टर इंडियासाठी पटकन होकार दिला.

पुढे श्रीदेवी यांच्या आईंची प्रकृती बिघडली. 1995मध्ये त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करायची होती. श्रीदेवींच्या जीवनातील हा कठीण काळ होता. यावेळी बोनी कपूर यांनी त्यांना साथ दिली. जेव्हा बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या आईच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा ते चेन्नईला गेले.

या शस्त्रक्रियेसाठी श्रीदेवी यांच्या आईंना अमेरिकेला नेण्यात आलं. बोनी कपूरही त्यांच्या सोबत होते. पण ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली. त्यानंतर बोनी कपूर यांनी या हॉस्पिटवर दावा ठोकला. या प्रकरणात शेवटी हॉस्पिटलसोबत तडजोड होऊन हॉस्पिटलने 16 कोटी रुपयांची भरपाई दिली.

Image copyright TWITTER/SRIDEVI BONEY KAPOOR

कठीण काळात बोनी कपूर ज्या पद्धतीनं मदत करत होते, ज्या प्रकारे त्यांच्या आईची काळजी घेत होते ते श्रीदेवी यांनी जवळून पाहिलं. श्रीदेवी यांच्या वडिलांचं निधन पूर्वीच झालं होतं. त्यामुळं त्या आईच्या फार जवळ होत्या.

आईच्या निधनानंतर 24 तास त्यांच्या घरी राहून श्रीदेवीला आधार देणारे बोनी कपूर हेच होते. या नात्याचं नंतर प्रेमात रूपांतर झालं.

Image copyright TWITTER/SRIDEVI BONEY KAPOOR
प्रतिमा मथळा श्रीदेवी आणि बोनी कपूर आपल्या दोन मुलींसह

एक अभिनेत्री म्हणून बोनी कपूर यांनी श्रीदेवी आवडत होत्या. पण श्रीदेवीसोबत लग्न होईल, असा विचार बोनी कपूर यांनी स्वप्नातही कधी केला नव्हता.

लग्नानंतर श्रीदेवी यांनी पंजाबी रूढी परंपरा शिकून घेतल्या. दक्षिणच्या असूनही स्वतःला एका पंजाबी कुटुंबात सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी कधीच बोनी कपूर यांना दक्षिण भारतीय रूढी परंपरांचा स्वीकार करण्यास सांगितलं नाही.

बोनी कपूर यांच्या कुटुंबाप्रती म्हणजेच त्यांचे भाऊ आणि भावाची मुलं यांच्याप्रती त्या समर्पित होत्या. चेन्नई इथल्या बंगल्यावर श्रीदेवी यांनी त्यांचे सासरे सुरिंदर कपूर यांच्या अमृतहोत्सवी वर्षानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.

Image copyright TWITTER / SRIDEVI BONEY KAPOOR
प्रतिमा मथळा श्रीदेवी या कपूर कुटुंबात रमल्या होत्या.

चेन्नईतील तब्बल 16 खोल्यांच्या या बंगल्यावर सासऱ्यांसाठी यज्ञपूजा करण्यात आली होती. पूजेनंतर आयोजित मेजवानीसाठी या कमल हासन आणि रजनीकांत होस्ट म्हणून पाहुण्यांना भेटत होते. हे दोघे अभिनेते श्रीदेवीचा मोठा आदर करतात.

श्रीदेवी या त्यांच्या प्रकृतीबद्दल फार सजग असायच्या. तर बोनी कपूर मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच विषयावर दोघांत वादही होत असतं.

Image copyright TWITTER / SRIDEVI BONEY KAPOOR

मुलगी जान्हवी हिच्या पहिल्या सिनेमाबद्दल म्हणजेच 'धडक'बद्दल फारच उत्सुक होत्या. त्यांनी स्वतःही घरी जान्हवीला प्रशिक्षण दिलं होतं.

तुम्ही हे वाचलं का?

हे तुम्ही पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)