सोशल : 'मुंबईच्या नद्यांबाबतचं गाणं मराठीत का नाही?'

मुख्यमंत्री

फोटो स्रोत, YouTube/T-Series

मुख्यमंत्र्याची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नव्यानं आलेल्या म्युझिक व्हीडिओवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

'मुंबई रिव्हर अँथम' या टी-सीरिजच्या व्हीडिओमध्ये अमृता फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता झळकले आहेत.

या अल्बमवर विरोधकांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या गाण्यात केलेल्या अभिनयावर बीबीसी मराठीनं वाचकांना त्यांची मतं मागवली होती. त्याचा हा गोषवारा.

फोटो स्रोत, facebook

मराठीभक्त सिद्धांत नावाच्या व्यक्तीनं या गाण्याच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. गाणं मुंबईच्या नद्यांबाबत आहे तर ते मराठीत का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, Facebook

तर "मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीनं अभिनय करण्यात काही गैर नाही", असं उज्ज्वलकुमार भाटकर यांना वाटतं. पण, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्यं योग्य रीतीनं पार पाडण्याची अपेक्षा भाटकर यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, facebook

"गाणी गाऊन जनतेचे प्रश्न सुटणार असतील तर ए. आर. रहमान यांची नियुक्ती करावी, किमान गाण्यांना संगीत तरी श्रवणीय मिळेल", अशी प्रतिक्रिया उदय इनामदार यांनी व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, facebook

गाण्याच्या भाषेवर मात्र अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अमोल गरंडेसुद्धा त्यातलेच एक आहेत. हिंदीत गाणं गाऊन मुख्यमंत्र्यांना कदाचित गंगेचं संवर्धन करायचं असेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

फोटो स्रोत, Facebook

शूटिंगमध्ये दाखवण्यात आलेल्या नद्या मुंबईच्या आहेत का? असा प्रश्न महिला मंडळ फोंडाघाट यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Facebook

स्वाती जोगदंड यांना मुख्यमंत्र्यांचा अभिनय आवडला आहे. "मुख्यमंत्री आपल्या जनतेचा आणि बायकोचा आदर करतात, मी मुख्यमंत्र्यांचा आदर करते", अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.

फोटो स्रोत, Facebook

प्रसाद खेकाळे यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबासुद्धा दिला आहे.

फोटो स्रोत, facebook

सुजित शेलार यांनी मात्र "काहीच समजलं नाही. मुंबईच्या नद्यांचं पाणी हिंदी केव्हापासून झालं", असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)