सोशल : 'आजकाल रंग लावणं म्हणजे त्रास देणं झालंय'

रंग

फोटो स्रोत, Getty Images

धुळवडीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या अनेक भागांसह देशभरात रंग खेळण्याचा दिवस.

धुळवडीच्या जल्लोषात मात्र अनेकदा काही जणांवर जबरदस्ती केली जाते. रंग खेळायचा नसला तरी जबरदस्तीनं त्यांना रंग लावला जातो. 'बुरा ना मानो होली है' अशी तंबीही दिली जाते.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, धुळवडीच्या दिवशी इच्छा नसलेल्यांना रंग लावावा का?

त्यावर आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांपैकी या काही निवडक प्रतिक्रिया.

अभिजीत म्हणतात, "आजकाल रंग लावणं म्हणजे उत्सव साजरा करणं नाही तर त्रास देणं झालं आहे. ऑईलपेंट किंवा हानिकारक रंग लावणं, फुगे मारणं, खराब पाणी अंगावर टाकणं अशा गोष्टी मुद्दाम केल्या जातात."

फोटो स्रोत, Facebook

"यानं लोकांना त्रास होतो. लोक एकत्र येऊन शांतपणे हा रंगोत्सव खेळत असतील तर छान आहे," असंही ते पुढे म्हणतात.

"धुळवड खेळण्याची कोणाची इच्छा नसेल तर जबरदस्ती करू नये. पण न खेळणाऱ्यांनी ही हे लक्षात ठेवावे की त्यांना खेळायचे नसेल तरी इतरांना खेळण्यापासून थांबवू नये. आपल्याकडे धुळवड न खेळता त्यावर नकारात्मक भाष्य करण्याऱ्यांची संख्या जास्त आहे," असं म्हटलं आहे अनिकेत कदम यांनी.

फोटो स्रोत, Facebook

तेजस रपटवार लिहितात, "समोरच्यावर त्याची इच्छा नसताना रंग टाकल्यास समोरचा आपल्याला कोणत्या स्वरूपात उत्तर देईल याचा नेम नाही. त्यामुळे कशाला रंगाचा बेरंग करावा?"

मानसी लोणकर यांचेही काहीसे असेच मत आहे. त्या म्हणतात, "कोणालाही जबरदस्ती रंग लावणे चुकीचे आहे. शेवटी प्रत्येकाला स्वतःचे मत आहे. प्रत्येक जण स्वतंत्र आहे."

फोटो स्रोत, Facebook

फोटो स्रोत, Facebook

तर बाळू चौगूले म्हणतात, इतरांच्या भावनांचा आदर करा.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)