#5मोठ्याबातम्या : शिवस्मारक L&T कंपनी उभारणार

शिवस्मारकाचे संकल्पित चित्र Image copyright MAHARASHTRA DGIPR
प्रतिमा मथळा शिवस्मारकाचे संकल्पित चित्र

आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :

1. शिवस्मारक L&T उभारणार

मुंबईतील शिवस्मारकाच्या बांधकामाचे काम अखेर L&T कंपनीला मिळालं आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या या शिवस्मारकाचं काम तीन वर्षांत पूर्ण होईल.

स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी L&T कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश आणि सुशांत शहादेव यांच्याकडे गुरुवारी या प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं पत्र सुपूर्त केलं. ठरलेल्या कालावधीपेक्षा लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे L&T कंपनीचे संचालक एम.व्ही. सतीश यांनी सांगितलं.

2. 'धर्माविरोधात नव्हे तर, दहशतवादाविरोधात लढा'

दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधातील लढाई कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. आपली लढाई तरुणांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात असल्याचंही मोदी 'Islamic Heritage : Promoting understanding and moderation' या विषयावरील परिसंवादात बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्समधल्या वृत्तानुसार, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीयही या प्रसंगी उपस्थित होते.

Image copyright Getty Images

"धर्माच्या नावाखाली मानवतेविरोधात गुन्हे करणाऱ्यांना ते धर्माला बदनाम करीत असल्याचे ध्यानात येत नाही," असंही मोदी म्हणाले. मूलतत्त्ववाद्यांविरोधात जॉर्डनचे राजे करीत असलेल्या जागृतीचा मोदींनी याप्रसंगी गौरव केला.

३. धनंजय मुंडेवरील आरोप प्रकरणी वृत्तवाहिनीवर हक्कभंग?

महाराष्ट्र विधिमंडळात लक्षवेधी सूचना चर्चेला येऊ नये म्हणून पैसे द्यावे लागत असल्याचा संदर्भ असलेली ध्वनिफीत एका मराठी वृत्तवाहिनीने बुधवारी सायंकाळी ऐकवली.

दैनिक दिव्य मराठीमधल्या वृत्तानुसार, विधिमंडळात या वृत्तामुळे प्रचंड खळबळ उडाली. या ध्वनिफितीतून धनंजय मुंडे यांचं नाव पुढे आल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी लावून धरली.

दरम्यान, विधान परिषदेत या वृत्तवाहिनीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रस्ताव स्वीकारून तो विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे पाठवत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

४. 'अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे मशीनने तुकडे करून खाडीत फेकले'

बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेंची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले, अशी कबुली या प्रकरणातील आरोपी महेश फळशीकर यांनी दिली आहे.

सामना मधल्या वृत्तानुसार, फळशीकर हा या प्रकरणातला आरोपी अभय कुरुंदकरचा जवळचा मित्र आहे. त्याला सोमवारी पुण्यातील कात्रज परिसरातून अटक करण्यात आली होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कळंबोली पोलिसांनी 7 डिसेंबर 2017 रोजी मुख्य आरोपी आणि निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक केली होती. 20 फेब्रुवारी रोजी कुरुंदकरचा खासगी वाहनचालक कुंदन भंडारी याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी झाल्यानंतर कुरुंदकरचा मित्र महेश फळणीकर याचे नाव पुढे आलं होतं.

5. कार्ती चिदंबरमना 5 दिवसांची CBI कोठडी

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ झाली आहे. द हिंदू मधल्या वृत्तानुसार, INX Media कंपनीशी संबंधित भ्रष्टाचारात कार्ती यांचा सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Image copyright KARTI P CHIDAMBARAM FACEBOOK
प्रतिमा मथळा कार्ती चिदंबरम

हे प्रकरण तपासाच्या प्राथमिक टप्प्यात असून यात आरोपीचा सहभाग असल्याचं दिसत असल्याने पुढील तपासात त्यांची चौकशी महत्त्वाची आहे. म्हणून या कोठडीत वाढ करत असल्याचे विशेष न्यायाधीश सुनिल राणा यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेक्झिट कराराच्या मसुद्याला कॅबिनेटची मंजुरी, युरोपीय युनियनकडून स्वागत

रणवीर-दीपिकाच्या विवाहस्थळाला जेव्हा पडला होता निर्वासितांचा गराडा

मराठा आरक्षणाचा अहवाल आज होणार सादर : #मोठ्याबातम्या

अवघ्या 5 मिनिटांमध्ये विक्रमी किंमतीत विकला गेला हा दुर्मीळ हिरा

USनं माणसांवर जैविक प्रयोग केल्याची रशियानं उठवली Fake News

नरेंद्र मोदींनी दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनाचं झालं काय?

वाळवलेल्या झुरळांपासून बनवलेला हा ब्रेड तुम्ही खाणार का?

राज्यातला साखर उद्योग अडचणीत, या कारणांमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन?

इमानी कुत्र्याने मालकिणीची पाहिली 80 दिवस वाट