होळी : नंदुरबारमध्ये 12 दिवस साजरा अनोखा होलीमाय उत्सव

  • प्राजक्ता धुळप
  • बीबीसी मराठी
Nandurbar

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

आदीवासींच्या पारंपरिक पोशाखात हा सण इथे साजरा केला जातो.

भारतात प्रदेश बदलला की भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि सण साजरे करण्याची पद्धतही. आता होळी म्हटलं की होलीका दहन, रंगांची उधळण आणि पुरणपोळी. पण नंदुरबारमधली आदिवासींची ही होळी जरा खास आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी होळीचा सण खूप मोठा. शेतातली कामं संपत आलेली असतात आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भिल्ल, पावरा, तडवी या आदिवासी जमाती होळी उत्साहात साजरी करतात.

आदिवासींचा होळी उत्सव 10-12 दिवस चालतो. जशी गावोगावी होळी पेटवली जाते, तशी या भागातली 'काठीची राजवाडी होळी' खूप प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यातल्या काठी या गावी होणारी ही होळी 700 वर्षांपासून चालत आली आहे.

फोटो स्रोत, BBC / PRAJAKTA DHULAP

फोटो कॅप्शन,

भिल्ल आदिवासींसाठी 'कोयता' महत्त्वाचं हत्यार आहे. ते सजवून होळीसमोर आणण्याचीही प्रथा आहे.

आदिवासी राजाच्या राजवटीपासून या होळीची परंपरा आहे, असं म्हटलं जातं. होळीला 'होलीमाय' म्हणायची प्रथा आहे. होळी मातेकडे सुबत्ता आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

होळीच्या उत्सवात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, पारंपरिक गाणी गातात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

सर्व आदिवासी असा सजावट असलेला पोषाख करत नाहीत. होळीकडे काही मागणं असलेले पुरुष होळीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे सजतात. त्याला 'मांता' म्हणतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

होळीसाठी गटागटाने सजण्याची परंपरा आहे. त्यातले काही जण मुखवटे परिधान करून सोंगं घेतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

होळीच्या पारंपरिक पोषाखात सुकलेल्या भोपळ्यापासून बनलेले डोले कंबरेभोवती गुंडाळतात आणि पायात घुंगरू बांधतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

होळीच्या रात्री वाजत गाजत आदिवासी आपापल्या गावाहून काठीकडे पोहोचतात. पूर्वी 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास पायीच करत.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

रात्रभर घुंगर, गाणी, आरोळ्या यांच्या जोडीला ढोलही असतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

रात्रभर जागरण करत अखेर पहाटे पाचच्या आसपास होळी पेटवली जाते.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

सेल्फीचा ट्रेंड इथंही.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

आदिवासींच्या पारंपरिक वेशात काही वर्षांपासून गॉगल आणि चष्म्याची फॅशन आलीय.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

आदिवासी स्त्री आणि पुरुष दोघेही चांदीचे दागिने परिधान करतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

या भागात नाण्यांचा हार परिधान करणं सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. ही जुन्या नाण्यांवर इंग्लडच्या किंग जॉर्ज Vचं चित्र आहे.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

होळी पेटल्यानंतरची राख घरी घेऊन जाण्यासाठी सकाळपर्यंत थांबतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

आता आदिवासी जीवनात बाहेरच्या जगाचा शिरकाव झाल्याने परंपरेसोबत काही गमतीशीर गोष्टीही पाहायला मिळतात.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

एका ढोलचं वजन साधारणत: 20 ते 25 किलो इतकं असतं.

फोटो स्रोत, BBC/Prajakta Dhulap

फोटो कॅप्शन,

आजही सातपुड्यातले सामान्य आदिवासी राजकीय सत्तेपासून खूप दूर आहेत. राजकीय पक्षांच्या खाणाखुणा नकळत त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे.

महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण म्हणजेच सेक्स रेशो 977 इतका आहे. आदिवासी भागात स्त्रियांच्या जगण्याचा स्तर उंचावलेला असल्याने हे प्रमाण सकारात्मक दिसतं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)