पाहा फोटो : या फोटोंमधून जाणून घ्या, आठवड्याभरात देशात काय घडलं

Image copyright SAM PANTHAKY
प्रतिमा मथळा गुजरात : अहमदाबादपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मागोडी गावात एका शेतकऱ्याने 27 फेब्रुवारीला आपल्या शेतातून नुकतेच काढलेले बटाटे.

देशभरात सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा झाला. हुताशनी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात धुळवड खेळली जाते तर देशभरात हा रंगांचा सण साजरा झाला.

त्यापैकीच काही शहरांमधले हे होळीचे रंग.

Image copyright kalpit bhachech
प्रतिमा मथळा गुजरात : होळीच्या दिवशी रंगात न्हाऊन निघालेली मुलं.
Image copyright Getty Image
प्रतिमा मथळा तामिळनाडू : चेन्नईमध्ये होळीच्या रंगात रंगलेली तरुणी.
Image copyright Navin/BBC
प्रतिमा मथळा हैद्राबादमध्ये होळीच्या रंगाचा हा नूर.

होळीचे रंग देशभर दिसत असताना हैद्राबादमध्ये मात्र चित्रपटातले रंग बंद होते. चित्रपटगृहचालकांनी बंद पाळला होता.

Image copyright Naveen/BBC
प्रतिमा मथळा डिजिटल सेवा पुरवठादारांच्या विविध सेवांच्या दरांच्या निषेधार्थ हैद्राबादमधील थिएटर चालकांनी 2 मार्चला बंद पाळला.
Image copyright NARINDER NANU/AFP/Getty Images
प्रतिमा मथळा पंजाब : अमृतसर इथं होळीनिमित्त आयोजित एका शोभायात्रेत सहभागी कलाकारांनी अशी होळीत अशी रंगत आणली.
Image copyright NARINDER NANU/AFP/Getty Images
प्रतिमा मथळा पंजाब : रात्रीची गस्त आता 'ती'च्या हाती

रात्री गस्त घालण्याची जबाबदारी असलेल्या कुलदीप कौर जालंदरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भांगीवाल या गावात रात्री ड्युटी बजावत असतात.

Image copyright PUNIT PARANJPE/AFP/Getty Images
प्रतिमा मथळा मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्यायात्रेच्या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)