सोशल : 'मग तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार?'

पांचजन्य Image copyright Panchajanya

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी सोशल मीडिया लोकांना अहंकारी बनवते असं मतं 'पांचजन्य'च्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे. त्यांच्या या मतावर बीबीसी मराठीच्या वाचकांनी विविध मतं व्यक्त केली. काही वाचकांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सोशल मीडियामुळे लोक शहाणे झाले तर संघावर विश्वास कोण ठेवणार, अशी स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भागवत यांच्या या वक्तव्यावर बीबीसी मराठीने वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या. त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथं देत आहोत.

मनीषा कांबळे यांना भागवतांचं मत पटलं नाही आहे. त्या लिहितात, "लोक अज्ञानातच राहिले पाहिजेत. ज्ञानी झाली तर यांच्या थोतांडावर विश्वास कोण ठेवणार? सोशल मीडियाव्दारे सर्व लोक शहाणे झाले तर यांना थापा मारता येणार नाहीत."

Image copyright Facebook

दत्ता देवकर यांचंही असंच मत आहे. "सोशल मीडियामुळे लोकांना खऱ्या गोष्टी लोकांना कळतात आणि खऱ्या गोष्टी समजल्या की 'संघा'चं पितळ उघड पडतं. म्हणून त्यांना सोशल मीडिया नको वाटतो," असं ते म्हणतात.

Image copyright Facebook

सतीश सांवत म्हणतात, "जगाबरोबर चालायला शिका भागवत साहेब ! सोशल मीडियाला कशाला दोष देत आहात? त्यामुळेच तर भाजपाला सत्ता मिळाली."

Image copyright Facebook

"सोशल मीडियाच्या आधीही अहंकारी माणस होती," असं मत मांडलं आहे अर्जुन बढे यांनी.

Image copyright Facebook

श्रीनाथ ठिगळे यांना मात्र भागवत यांचं मत योग्य वाटतं. "सोशल मीडिया हे काल्पनिक जग आहे. त्याचा मर्यादित वापर करावा. मोहन भागवतांच्या या वक्तव्याशी सहमत आहे."

Image copyright Facebook

"कुठलीही गोष्ट माणसाला अहंकारी बनवू शकते. त्यात सोशल मीडियाचं कशाला?" असा प्रश्न विचारला आहे श्रीनिवास बाळकृष्णन यांनी.

Image copyright Facebook

अभिषेक मित्रा यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "लोक आपल्या जवळच्यांना सोडून आभासी जगाशी संपर्क साधण्यात व्यस्त झाले आहेत."

Image copyright Facebook

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)