पाहा व्हीडिओ : पैशाची गोष्ट : स्टार्ट अप खरंच फायद्याचे आहेत का?
पाहा व्हीडिओ : पैशाची गोष्ट : स्टार्ट अप खरंच फायद्याचे आहेत का?
पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया स्टार्ट अपविषयी. तुम्हाला हे माहीत आहे का की, इन्फोसिस ही सुरुवातीला एक स्टार्ट अप कंपनीच होती. एखादी नवीन कल्पना वापरून पूर्वानुभव नसताना त्यातून उद्योग उभा करायचा म्हणजेच स्टार्ट अप.
आता इन्फोसिस जागतिक दर्जाची सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी झाली आहे. सांगण्याचा हेतू हा की, लोकांना उपयोगी पडणारी कुठलीही कल्पना आपण स्टार्ट अपच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणू शकतो.
तेव्हा स्टार्ट अप कंपनी कशी सुरू करायची, त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतात, आर्थिक पाठबळ कुठून मिळवायचं हे जाणून घेऊया...
निवेदक - ऋजुता लुकतुके
निर्माती - सुमिरन कौर
एडिट -परवेझ खान
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)