पैशाची गोष्ट : ट्रेड वॉरचा भारतावर परिणाम होईल का?

पैशाची गोष्ट : ट्रेड वॉरचा भारतावर परिणाम होईल का?

पैशाची गोष्टमध्ये या आठवड्यात बोलूया ट्रेड वॉरविषयी. अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन महासत्ता या आठवड्यात आमने सामने आल्या. निमित्त होतं व्यापारी संघर्षाचं.

चीनकडून अमेरिकेत येणाऱ्या निवडक वस्तूंवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात कर लावला. हेतू हा की चीनकडून होणारी आयात कमी व्हावी आणि देशांतर्गत उत्पादनाची मागणी वाढावी.

चीनला हे रुचणारं नव्हतंच. त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. परिणामी, चर्चा सुरू झाली व्यापारी युद्ध किंवा ट्रेड वॉरची ही सुरुवात आहे का?

जर भविष्यात असं युद्ध किंवा संघर्ष झालाच तर भारतावर याचे काय परिणाम दिसतील? मूळात ट्रेड वॉर म्हणजे काय? या सगळ्या मुद्यांचा घेतलेला हा परामर्श...

निवेदक - ऋजुता लुकतुके

निर्माती - सुमिरन प्रीत कौर

एडिटिंग - परवेझ अहमद

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)