पाहा देशभरातल्या घडामोडीची फोटोमय झलक

वाघ
फोटो कॅप्शन,

अहमदाबाद : गुजरातमधल्या एका प्राणीसंग्रहालयात मस्तपैकी पाण्यात डुंबलेला हा वाघ. वाढत्या उन्हापासून सुटका करून घेण्याचा तात्पुरता मार्ग त्यानं शोधला.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनांपासून देशभरात गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या सण उत्सवांपर्यंत, काय काय घडलं? त्यातल्या काही घटनांचे हे फोटो.

फोटो कॅप्शन,

अहमदाबाद : झाडे वाचवा! वडाचं झाड वाचवण्यासाठी महापालिकेच्याविरोधात रस्त्यावर उतरलेले नागरिक.

फोटो कॅप्शन,

नवी दिल्ली : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रामलीला मैदानात सात दिवस उपोषण केलं.

फोटो कॅप्शन,

नवी दिल्ली : अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी व कार्यकर्ते जमले, पण 2011सारखी गर्दी आणि हवा मात्र होऊ शकली नाही.

फोटो कॅप्शन,

दिल्ली : शहरातल्या सिलिंग अभियानाविरोधात व्यापारी आंदोलन करत आहेत. अशाच एका व्यापाऱ्यानं निषेध म्हणून सिलिंगयुक्त कुलुप गळ्यात अडकवलं.

फोटो कॅप्शन,

कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं! जोतिबाची यात्रा चैत्र महिन्यात पौर्णिमेला असते. तिथला उत्साह दाखवणारी हे दृश्य.

फोटो कॅप्शन,

अमृतसर : रामनवमीनिमित्तानं निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या एका भक्तानं माँ कालीचं रुप घेतलं होतं.

फोटो कॅप्शन,

अमृतसर : गुड फ्रायडेनिमित्त काढण्यात आलेल्या यात्रेतलं हे दृश्य

फोटो कॅप्शन,

चेन्नई : कपिलेश्वराची शोभायात्रा. या यात्रेत सहभागी झालेली वादक मंडळी.

फोटो कॅप्शन,

चेन्नई : जर्मनीचे राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांनी वाहनांच्या कारखान्यास भेट दिली. तिथं कर्मचाऱ्याशी संवादही साधला.

फोटो कॅप्शन,

श्रीहरी कोटा : इस्त्रोनं या आठवड्यात जीसॅट-6A उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. मोबाइल कम्युनिकेशनसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

फोटो कॅप्शन,

हैद्राबाद : महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या तरुणी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)