कॉमनवेल्थमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या गुरुराजाबद्दल या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

Image copyright MIB
प्रतिमा मथळा के.पी. गुरुराजा

बुधवारी झालेल्या दिमाखदार उद्घान सोहळ्यानंतर काही तासातच के. पी. गुरुराजा यांनी भारताला ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं. गुरुराजानं रौप्यपदकाची कमाई केली आहे.

पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात गुरुराजानं 249 किलो वजन उचलत पदकावर आपलं नाव कोरलं.

1) 25 वर्षीय गुरुराजा मूळचा कुंदापूर, कर्नाटकचा आहे.

2) ट्रक ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या गुरुराज यांना आठ भावंडं आहेत.

3) 2010 मध्ये दक्षिण कर्नाटकात गुरुराजानं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथंच त्यांनी वेटलिफ्टिंगच्या करिअरची सुरुवात केली.

Image copyright Getty Images

4) दोन वर्षांपूर्वी कॉमनवेल्थ सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये गुरुराजानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

5) गुरुराजानं गुवाहाटीत झालेल्या सॅफ अर्थात साऊथ एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)