सोशल - 'भाजपच्या अंताची सुरुवात मुंबईतल्या याच शक्तिप्रदर्शनातून होणार!'

भाजपचा शुक्रवारी 38वा स्थापना दिन होता. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भाजपचा शुक्रवारी 38वा स्थापना दिन होता.

भाजपच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील MMRDAच्या मैदानात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी देशभरातून भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत आले होते.

पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी भाजपची वाटचाल आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची तुलना महापुराशी करत शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

दरम्यान, भाजपच्या या अधिवेशनाबद्दल बीबीसी मराठीने वाचकांना प्रतिक्रिया मागवल्या होत्या...

विशाल माळी म्हणतात, "आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला, बुलेट ट्रेन गुजरातला मग मुंबईत शक्तिप्रदर्शनाचं कारणच काय फक्त आणि फक्त शिवसेना, मनसे आणि मराठी माणसाला खिजवण्यासाठीच."

Image copyright Facebook

तर "मोदी सत्तेत असून पण महाराष्ट्र मध्ये पूर्ण बहुमत नाही मिळालं, आता तर लोकं वैतागली आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीला यांना ६० सीट पण नाही मिळणार," असं मत करण माधवी यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

"तुम्ही सगळे भाजपला एवढं वाईट बोलत आहात. पण 2019 ला भाजपला नाही तर कोणाला मत देणार," असा प्रश्न भाग्येश वाघ यांना उपस्थित केला आहे.

Image copyright Facebook

"भाजपच्या अंताची सुरुवात याच शक्तिप्रदर्शनातून होणार," असं विनोद जाधव म्हटलं आहे.

Image copyright Facebook

संतोष पवार यांनी "नक्की भाजपचेच कार्यकर्ते होते की भाड्याने आणलेली माणसं होती?" अशी शंका उपस्थित केली आहे.

Image copyright Facebook

मुंबईकर खूप हुशार असून आता भाजपवाल्यांनी त्यांना हवं ते केलं, पण मुंबईकर त्यांना हवं तेच करून दाखवणार, असं रामचंद्र साबळे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)