सलमान खानला जामीन मंजूर, तुरुंगातून सुटका

सलमान खान Image copyright STR/AFP/Getty Images

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर न्यायालयाने गुरुवारी सलमान खानला दोषी ठरवले होते. दोन दिवसांपासून कोठडीत असलेल्या सलमान खानला शनिवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. संध्याकाळी उशीरा मुंबईत पोहोचलेल्या सलमानला बघायला वांद्र्यातल्या त्याच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर न्यायालयाने गुरुवारी सलमान खानला दोषी ठरवलं होतं. तसेच त्याला 5 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. आता 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमानला सोडण्यात यावं, असं न्यायालयानं जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी सांगितलं.

शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची रवानही जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली होती. संध्याकाळी जमीनाबाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सलमानची सुटका करण्यात आली.

दरम्यान आज जामीन अर्जावर सुनावणी असल्याने सकाळपासूनच कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी जमायला सुरुवात झाली होती, असं बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी सांगितलं.

काळवीट शिकार प्रकरण 1998 मध्ये झालेलं होतं. असे 4 खटले सलमान खानवर दाखल करण्यात आले होते. बिष्णोई समाजानं हे सलमान आणि इतर अभिनेत्यांविरोधात हे दावे दाखल केले होते.

या प्रकरणात अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

1998 ला हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंगवेळी हा प्रकार घडला होता. या प्रकरणात सलमान खानवर 4 गुन्हे नोंद होते. मथनिया आणि भवाद या ठिकाणी काळविटांच्या शिकार प्रकरणी 2, कांकाणीमध्ये हरणांची शिकार प्रकरणी 1 आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात 1 असे एकूण 4 गुन्हे सलमान खानवर नोंद होते. तीन काळविटांच्या शिकारीप्रकरणी सलमानला पहिल्यांदा जोधपूरच्या न्यायालयानं एका वर्षाची शिक्षा सुनावली होती.

Image copyright Supriua Sogle
प्रतिमा मथळा सलमान खानच्या मुंबईतल्या घराबहेर चाहत्यांची गर्दी जमली होती.

मुंबईत सलमान खानच्या सुटकेची बातमी कळताच त्याच्या निवासस्थानाजवळ चाहत्यांनी गर्दी केली. मुंबईतल्या बीबीसीच्या पत्रकार सुप्रिया सोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानचे फॅन गुरुवारपासूनच त्याच्या बांद्र्यातल्या गॅलक्सी अपार्टमेंटजवळ गर्दी करायला सुरुवात केली होती. शनिवारी जामीन मंजूर झाल्याची बातमी आल्यानंतर ही गर्दी वाढली. काही चाहते मिठाई घेऊनही आले होते.

हरणाच्या शिकारप्रकरणी सलमानला 10 एप्रिल 2006 मध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली होती. जोधपूरजवळच्या मथानियानजीक घोडा फार्म याठिकाणी 28-29 सप्टेंबर 1998 रोजी शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी जोधपूर हायकोर्टानं सलमानला जामीन दिला होता. या दोन्ही प्रकरणी जोधपूर हायकोर्टात 12 मे रोजी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती.

Image copyright Supriya sogle
प्रतिमा मथळा सलमान खानच्या बांद्र्यातल्या गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांनी गर्दी केली.

तिसरा खटला कंकाणी गावाशी संबंधित आहे. 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी दोन हरणांची शिकार करण्यात आल्याचा हा आरोप आहे. आर्म्स अॅक्ट अंतर्गत आणखी आरोप निश्चित करण्यात आले. हे प्रकरण जुलै 2012 पर्यंत प्रलंबित होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)