फेसबुक तुमच्या डेटाचं करतं तरी काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : फेसबुक तुमच्या डेटाचं करतं तरी काय?

दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घडामोडींची माहिती आपण रोज फेसबुकवर टाकत असतो. पोस्ट, फोटो, चेक-इन्सच्या माध्यमातून आपलं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करत असतो.

फेसबुकवर दिलेल्या या माहितीच्या आधारे एक अल्गोरिदम फेसबुक युजर्सचं मनोवैज्ञानिक प्रोफाईल तयार करतं. या प्रोफाईलद्वारे मग युजर्सच्या आवडीनिवडींवर आधारित जाहिराती न्यूजफीडमध्ये दिसतात.

आता एका नव्या डेटा लीक प्रकरणाअंतर्गत अशी शंका व्यक्त केली जातेय की ही सगळी माहिती गोळा करून 2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनं वळवण्यात आली.

पण फेसबुकच्या माहितीच्या आधारे राजकीय विचारसरणी खरंच बदलता येते का?

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)