कॉमनवेल्थ गेम्स 2018 : श्रेयसी सिंगला नेमबजीत सुवर्ण पदक

सिंग Image copyright Getty Images

श्रेयसी सिंगपाठोपाठ नेमबाजीमध्ये भाराताच्या वाट्याला आणखी एक पदक आलं आहे. अंकुर मित्तलनं डबल ट्रॅपमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे.

श्रेयसी सिंगनं महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम लढतीत श्रेयसी आणि ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्स यांच्यात बरोबरी झाली. अटीतटीच्या शूटआऊटमध्ये श्रेयसीनं इमाला नमवत बाजी मारली.

Image copyright Getty Images

सुपरमॉम बॉक्सिंगपटू मेरी कोमनं कॉमनवेल्थ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत पदक पक्कं केलं. महिलांच्या 48 किलो वजनी गटातून खेळणाऱ्या मेरीनं उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या अनुशा कोडिथूवाकूचा 5-0 असा धुव्वा उडवला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ओम मिथरवाल

दरम्यान 50 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ओम मिथरवालनं कांस्यपदकाची कमाई केली. अव्वल नेमबाज आणि पदकाचा प्रबळ दावेदार जितू रायला मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)