सोशल : ATM मध्ये कॅशचा दुष्काळ, सोशल मीडियावर मात्र चर्चेचा सुकाळ

ATM Image copyright BBC/SAMIR

भारतातल्या अनेक राज्यांमधल्या ATMमध्ये कॅश नाही अशा बातम्या येत आहेत. कॅश नसण्याच्या सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून येत आहेत.

मात्र अर्थमंत्री अरूण जेटलींनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, कॅशची कमतरता फक्त काही भागांमध्येच आहे आणि यावर लवकरच उपाय केला जाईल.

जेटलींनी ट्वीट केलं आहे ज्यात म्हटलं आहे की, "आम्ही देशातल्या रोखतेचा आढावा घेतला आणि सध्या देशात पुरेसा रोख रकमेचा साठा आहे. बँकांमध्येही रोख रक्कम उपलब्ध आहे.

सध्या असणारी रोख रकमेची चणचण ही 'अचानक आणि असामान्य' रितीनं झालेल्या मागणीमुळे उद्भावली आहे. यावर उपाययोजना करत आहोत."

देशातली सगळ्यांत मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रजनीश कुमार यांच्या मते, "पुढच्या काही आठवड्यात परिस्थिती पूर्ववत होईल. असं होणं काही नवी गोष्ट नाही."

दुसऱ्या बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रोख कॅशच्या कमतरतेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना विचारलं होतं की, तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? असेल तर आम्हाला सांगा. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये लोकांना ATM मध्ये कॅश नसण्याचा अनुभव आला आहे.

आशिष कांबळे लिहितात, "वर्ध्यात ATMमध्ये पैसे नाही आहेत. ठणठणगोपाळ आहे."

Image copyright Facebook

"भर उन्हात काल दिवसभर भटकावं लागलं. माझा मित्र दिवसभर त्रासात होता, पण पैसे मिळाले नाहीत," असं सांगितलं आहे तौसिफ वहाब यांनी.

Image copyright Facebook

"मोदी का जादू है सब," असा टोमणा मारला आहे अनुप बांगडकर यांनी.

Image copyright Facebook

"सगळी कॅश आता निवडणुकांकडे वळवली आहे," असं मत व्यक्त केलं आहे आनंद मून यांनी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)