सोशल - 'चर्चा झाली तर पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरवरील हक्क सोडणार?'

किम जाँग-उन आणि मून जे-इन Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा किम जाँग-उन आणि मून जे-इन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी सीमोल्लंघन करत दक्षिण कोरियाचे नेते मून जे-इन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही कोरियांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता.

1953च्या कोरियन युद्धविरामानंतर कुठल्याही कोरियन राष्ट्रप्रमुखाची ही कोरियन सीमा ओलांडण्याची पहिलीच वेळ होती.

1953 साली दोन्ही कोरियांमधलं युद्ध संपलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधलं वैर दिवसेंदिवस वाढतंच गेलं. पण उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी आता युद्ध टाळण्यासाठी अण्वस्त्र नष्ट करण्याचा निर्धार केला आहे.

याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं आपल्या वाचकांना भारत आणि पाकिस्ताननं या भेटीतून काय धडा घ्यावा असा प्रश्न विचारला होता. त्यावर वाचकांनी प्रतिक्रिया काही निवडक प्रतिक्रिया.

"चर्चा घडून येण्यासाठी यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, पक्ष किंवा देश मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असायला हव्यात. नाहीतर, चर्चा ही निष्फळ आणि निरुपयोगी ठरते," असं मत वैभव मसराम यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

बाबू डिसूझा म्हणतात, "तिथं धर्म एक आहे. इथं बिब्बा घालणारे अनेक आहेत. द्वेषावर पोसलेलं राजकारण संपणं त्यांना आवडणारं नाही आणि परवडणारं नाही."

Image copyright Facebook

"भारत पाकीस्तान पुढे मैत्री शिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही, भविष्यात या दोन्ही देशांची जनताच एकमेकांची सोबत घेऊन आतंकवादाला संपवतील," असं मत अजय चौहान यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"त्यांचं हे पहिल्यांदा आहे. आपल्याकडे हे खूप वेळा होऊन गेलं आहे, आणि आपल्यासारखं त्यांच्याकडे रोज-रोज अतिरेक्यांसोबत युध्द होत नाही. म्हणून आपल्याकडे पर्याय एकच आहे, एक तर आर या पार," सत्यजित भांमरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Image copyright Facebook

अभिजीत यांनी मात्र एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे.

"चर्चा झाली तर पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरवरील हक्‍य सोडणार का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तर राजू कार्ले यांना "पूर्व आणि पश्चिम जर्मनी प्रमाणे भारत पाकिस्तान, उत्तर आणि दक्षिण कोरिया यांनी एक होणे गरजेचे आहे," असं वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)