मध्यप्रदेश : पोलीस भरतीत उमेदवारांच्या छातीवर 'जाती' कोणी लिहिल्या?

मानवी शरीर Image copyright SUREIH NIYAZI/BBC
प्रतिमा मथळा मानवी शरीर

मध्य प्रदेशात धार जिल्ह्यात पोलीस हवालदार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होती. राज्यभरातून अनेक उमेदवार आले होते. यापैकी अनेक उमेदवारांच्या छातीवर SC, ST लिहिण्यात आलं होतं! का?

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या छातीवर त्यांची जात लिहिली की ओळखणं सोपं जातं, असं भरती करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

या प्रकरणाची चर्चा होऊ लागली तेव्हा या प्रक्रियेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितलं की छातीवर असं जात लिहिण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. आता मात्र या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

असं का करण्यात आलं?

आरोग्य चाचणीत खुल्या गटासाठी आणि आरक्षण असणाऱ्यांसाठी उंचीचे वेगवेळे निकष आहेत.

मुख्य तपासणी अधिकारी आर. सी. पनिका यांनी याबाबत सांगितलं की, "निवडण्यात आलेल्या उमेदवारांची आरोग्य चाचणी सुरू करण्यात आली आहे, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती."

Image copyright Getty Images

"असं जात छातीवर लिहीणं हे अजिबात योग्य नाही. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून दोषींवर कारवाई करण्यात येईल," असं पनिका पुढे म्हणाल्या.

उमेदवारांना भीती

याप्रकरणी धार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी देखील या घटनेच्या तपास करण्याचे आदेश दिले आहेत. ते सांगतात, "जात लिहिण्याचे आदेश आमच्याकडून देण्यात आले नव्हते. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जे घडलं ते योग्य नाही."

अशा प्रकरणाला सामोरं गेल्यानंतर पोलीस भरतीत सहभागी झालेले उमेदवार या घटनेबद्दल खरी बाजू सांगण्यासाठी घाबरत आहेत. त्यांना भीती आहे की जर ते खरं बोलले तर त्यांची नोकरीची संधी हातातून जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)