अवघ्या महिनाभरातच त्यांनी केलं सोनम कपूरला प्रपोज

आनंद अहुजा Image copyright Instagram/anandahuja

'जो जादू में यक़ीन नहीं करते, उन्हें कभी जादू नहीं मिलता!'

एक बात जो मुझे हमेशा से चौंकाती है, वो ये 'अगर हम किसी एक व्यक्ति को ख़ुश करते हैं, तो पूरी दुनिया ख़ुश रहती है.'

कितनी सीधी और सच्ची सी बात है. दुनिया में सुकून और अमन का तरीका यही है कि अपने आसपास वालों से प्यार करो.

या ओळी प्रेमात आकंठ बुडालेल्या सामान्य व्यक्तीच्या नाही तर सोनम कपूर यांचे होणारे पती आनंद अहुजा यांनी त्यांच्यासाठी लिहिलेल्या आहेत.

गेले अनेक दिवस अनिल कपूर आणि सुनीता यांची मुलगी सोनम आणि दिल्लीतील व्यापारी कुटुंबातील सदस्य आनंद अहुजा यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. पण त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

सोनम आणि आनंद यांचं लग्न मुंबईत 8 मे रोजी होणार आहे. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. काही वेळातच त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली.

सोनम आणि आनंद यांच्या कुटुंबीयांनी काढलेल्या एका संयुक्त निवेदनात, "कपूर आणि अहुजा कुटुंबीयाच्या लग्नाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. लग्न 8 मे ला मुंबईत होईल," असं जाहीर केलं.

"हा एक कौटुंबिक सोहळा आहे. आमच्या खासगीपणाचा आदर राखला जावा अशी आमची इच्छा आहे. या आनंदाच्या क्षणी आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या," असंही या निवेदनात पुढे म्हटलं आहे.

Image copyright Instagram/anandahuja

सोनम आणि आनंदच्या मेहेंदीचा कार्यक्रम 7 मे ला वांद्रे येथील सिग्नेचर आयलँडमधील सनटेक येथे होईल. दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा बॅण्डस्टॅण्ड येथील रॉकडेलमध्ये होणार आहे. हा सोनम यांच्या नातेवाईकांचा बंगला असल्याचं सांगण्यात येतं. लग्नाची वेळ सकाळी 11 ते 12 पर्यंतची आहे.

त्यानंतर, मुंबईतल्याच 'द लीला' हॉटेलमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं आहे. लग्नासाठी कपूर आणि अहुजा कुटुंबानं ड्रेस कोडही ठेवलाय.

पण लग्नाच्या पत्रिकेवर संगीत समारंभाचा उल्लेख नव्हता. करण जोहरनं संगीत कार्यक्रमाची जबाबदारी घेतली आहे. तर, फराह खान कोरियोग्राफी करणार अशा बातम्या येत होत्या.

आनंद अहुजा हे दिल्लीचे असून ते भाने या पोशाखांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे प्रमुख आहेत.

त्याशिवाय ते दिल्लीत व्हेज नॉन व्हेज नावाचं मल्टी ब्रँड स्नीकर बुटीकसुद्धा चालवतात. ते शाही एक्सपोर्ट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या कंपनीचा टर्न ओव्हर 3000 कोटी रुपयांच्या घरात आहे.

Image copyright Instagram

आनंद अमेरिकन एम्बसी शाळेचं माजी विद्यार्थी आहेत. पेन्सलव्हिनियाच्या व्हॉर्टन स्कूलमधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.

त्यांनी अमेरिकेत अमेझॉन कंपनीत इंटर्नशिप केली आणि मग दिल्लीत वडील हरीश अहुजा यांच्या व्यवसायात सहभागी झाले.

2014 मध्ये फॅशन डिझाईनर आणि सोनमची स्टाईलिस्ट प्रेरणा कुरेशी यांच्यामार्फत आनंद अहुजा सोनमला भेटले. एक महिन्याच्या आतच आनंद यांनी सोनमला प्रपोज केलं.

Image copyright Instagram/anandahuja

सोनम आणि आनंद सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा अनेकदा एकत्र दिसतात.

फेब्रुवारीमध्ये आनंद, सोनम यांच्याबरोबर मोहित मारवाह यांच्या लग्नाला गेले होते. श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारासाठीही ते एकत्रच गेले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)