सोशल - 'त्यापेक्षा दलितांना हक्क द्या, समानतेची वागणूक द्या'

दलित Image copyright Getty Images/SAJJAD HUSSAIN

दलितांबद्दल प्रेम दाखवण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन जेवण्याच्या पद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नाराजी व्यक्त केली आहे. दलितांच्या घरी जेवणं पुरेसं नाही, त्यांनाही तुमच्या घरी जेवणाचं निमंत्रण द्या, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजप नेत्यांना दिला आहे. अनेक भाजप नेते दलितांच्या घरी जेवायला गेलं होते. त्याआधी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेतेही दलितांच्या घरी जेवले होते.

"ज्याप्रकारे दलितांच्या घरी जाऊन जेवणाचा दिखावा सुरू आहे तो चुकीचा आहे. भाजप भलेही हे सामाजिक रणनीती म्हणून करत आहे. पण हे चुकीचं आहे. भाजपनं त्यासाठी मीडियाला बोलवून दिखावा करायला नको. दलित समाजापर्यंत पोहोचण्याचा खरा आणि प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. संघ बऱ्याच काळापासून अशाप्रकारचे कार्यक्रम करत आहे," असं ते पुढे म्हणाले.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

"भाजपच्या या नौटंकीला दलित समाज बळी पडेल असं जर भाजप ला वाटत असेल तर ते मूर्खांच्या जगात वावरत आहेत असेच म्हणावे," असं मत श्याम ठाणेदार यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"दलित हे काही भिकारी नाहीत त्यांना सवर्ण लोकांच्या घरी जेवायला बोलवायला, त्यापेक्षा त्यांना त्यांचा हक्क द्या समानतेची वागणूक द्या मतांसाठी त्यांचा वापर करणं सर्व राजकीय पक्षांनी आता बंद करा," अशी प्रतिक्रिया अभिजीत यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

लोकांच्या होणाऱ्या टीकेमुळे विरूध्द जाणारे जनमानस भाजपच्या सत्ताकांक्षेला घातक ठरण्याचा धोका ओळखून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे, असं बाबू डिसोझा सांगतात.

Image copyright Facebook

तर त्यांच्यासोबत जेवण्याऐवजी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या, तुम्हालाच दुवा मिळेल, असं मत नितीन रावसाहेब देशमुख यांनी म्हणतात.

Image copyright Facebook

प्रज्ञा ओहाल यांचं मतंही नितीन यांच्याशी मिळतं जुळतं आहे. त्या म्हणतात, दलिताच्या घरी जेवण्यापेक्षा दलितांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणजे झालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)