सोशल - 'नमाज पठण असो की कुठली शोभायात्रा असो, धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर नकोच'

नमाज पठण Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नमाज पठण

हरियाणाच्या गुरूग्राममध्ये गेल्या काही दिवसांपासून खुल्या जागेत नमाज पठणाबाबत वाद सुरू आहे.

याची सुरुवात गेल्या शुक्रवारी झाली. एका सार्वजनिक ठिकाणी जुम्माचं नमाज पठण सुरू होतं त्यावेळी तिथं हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी खुल्या जागेतल्या नमाज पठणाला विरोध केला.

त्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 'नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी करण्यापेक्षा मशिदींमध्ये करावं', असं वक्तव्य केलं.

Image copyright FACEBOOK/MLKHATTAR
प्रतिमा मथळा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर

नमाज पठण हे मशिदीत किंवा ईदगाह मैदानातच व्हायला हवं, असंही खट्टर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी स्वगत केलं आहे.

काही संघटनांनी खुल्या जागेत नमाज पठणाला विरोध करत नुकतीच त्याविरोधात निदर्शनंही केली.

दरम्यान याबाबत बीबीसीनं वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काही वाचकांनी खट्टर यांच्या मतशी सहमती दर्शवली आहे, तर काहींनी हा ज्याचा त्याच्या वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

इरफान शेख यांनी सविस्तर पोस्ट लिहून त्यांच मत व्यक्त केलं आहे. त्यांच्यामते, रस्त्यावरचं नमाज पठण हे हौस किंवा शक्तिप्रदर्शन नाही. तर ते मशिदीतल्या जागेच्या कमतरतेमुळे आहे. तसंच टीका करायची म्हणून किंवा मनातला द्वेष व्यक्त करायचा म्हणून असं टार्गेट करणं चुकीचं आहे, असं त्यांनी लिहिलं आहे.

Image copyright Facebook

इरफान यांच्या या प्रतिक्रियेवर, परेश रेगे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी नमाज पठणाच्यावेळी त्यांच्या भागात 1 तास होणाऱ्या वाहतूक कोंडीचा दाखला त्यात दिला आहे.

Image copyright Facebook

"तर नमाज पडून कोणावर उपकार करत नाही. नमाज पडताना कोणाला काही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. नमाज मशिदीमध्येही झाली पाहिजे," असं मत सैयद तौहीद यांनी व्यक्त केलं आहे.

"नमाज पठण असो की कुठली शोभायात्रा असो, धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर नकोच, मग तो कार्यक्रम कुठल्याही धर्माचा असो," अशी प्रतिक्रिया गुरू बाल्की यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

धर्म ही वैयक्तिक बाब आहे. ती चार भितींच्या आत होणंच राज्यघटनेला अपेक्षित आहे, असं मत चेतन ढवळे यांनी नोंदवलं आहे.

Image copyright Facebook

रस्ता हा वाहनांसाठी आणि मशिद नमाज अदा करण्यासाठी. जर रसत्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करायची असेल तर मशिदी का बांधायच्या? असा प्रश्न सोनल वर्तक यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)