कर्नाटक : 3 एक्झिट पोल्सनुसार भाजप, 2 पोल्सनुसार काँग्रेस मोठा पक्ष

कर्नाटकात प्रचारादरम्यान राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्नाटकात प्रचारादरम्यान राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची चुरस आता कमालीची वाढली आहे. मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल्सचे अंदाज आले आहेत. 5 पैकी 3 पोल्सनुसार भाजप सर्वांत मोठा पक्ष होऊ शकतो, पण बहुमतापासून दूर राहील. एका पोलनुसार काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होऊ शकतो तर एका पोलनुसार काँग्रेसला बहुमत मिळू शकतं.

आज कर्नाटकात 70 टक्के मतदान झालं, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय. गेल्या वेळी हा आकडा 71 टक्के एवढा होता.

काँग्रेस भाजप जेडीएस
ABP-CVoter 88 107 21-30
इंडिया न्यूज-चाणक्य 72-78 102-110 35-39
टाइम्स नाऊ-VMR 90-103 80-93 31-39
रिपब्लिक-जनता की बात 73-82 95-114 32-43
आज तक-Axis 106-118 79-92 22-30

या आकड्यांवर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पाबा निकालांचे LIVE अपडेट्स

ANI वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश म्हणतात की आता त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर 15 मे या निकालाच्या दिवशी खरा निकाल लागणारच नाही.

पत्रकार माधवन नारायणन लिहितात की त्रिशंकू विधानसभा आली तर भाजप सत्तेत येऊ शकत नाही, कारण काँग्रेस जेडीएसला मुख्यमंत्रिपद देऊ शकते.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई लिहितात की 15 मेपर्यंत वाट पाहणे हेच योग्य आहे.

तेलंगणाचे मंत्री के.टी. राव यांनी लिहिलंय की वेगवेगळी चॅनल्स वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत आणि हे गोंधळात टाकणारं आहे.

बंगळुरू इथल्या पत्रकार धन्या राजेंद्रन लिहितात की एक्झिट पोल्सच त्रिशंकू झाले आहेत.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

कर्नाटक निवडणुकीच्या या बातम्या वाचल्या का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)