सोशल : 'भाजपचा हातातोंडाशी आलेला घास जाणार बहुतेक'

मोदी Image copyright Getty Images

कर्नाटकच्या निकालांमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरीही भाजपला बहुमताचा आकडा मात्र गाठता आला नाही. त्यामुळे कर्नाटकचं राजकारण रंगतदार अवस्थेत आलं आहे.

निकालांचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांमध्ये गाठीभेटींना वेग आला. या बैठकांनंतर काही वेळातच काँग्रेसनं जेडीएसला बिनशर्त पाठिंबाही दिला. या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांची वेळ मागत सरकार स्थापनेचा दावा केला.

काँग्रेसच्या दाव्याला प्रत्युत्तर देत भाजपनंही सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपचे नेते येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला आणि 8 दिवसांची मुदत मागितली आहे.

"काँग्रेसला लोकांनी नाकारलं आहे तरी ते मागच्या दारानं सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. कानडी जनता हे खपवून घेणार नाही," असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसंच पुढील निर्णयांबाबत अमित शाह आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना विचारलं होतं की, मोदी-शहा जोडीसमोर राहुल गांधींचा टिकाव लागत नाही आहे का?

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या, त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया इथे देत आहोत.

हर्षद म्हैसकर लिहितात, "भाजपचं कर्नाटकात हात को आया मुह ना लगा असं होऊ शकतं असं दिसतंय."

Image copyright Facebook

संदीप जाधव म्हणतात, "ज्या धर्तीवर गोव्यात भाजपनं असंविधानिक बेरीज करून सत्ता स्थापन केली, त्याप्रमाणे काँग्रेसनं JDS सोबत बेरीज करून सत्तास्थापनेचा दावा करावा."

Image copyright Facebook

"काँग्रेस आणि भाजप हे दोन पर्याय जिथं असतात तिथं लोक भाजपला निवडतात," असं मत व्यक्त केलं आहे बीबीसी मराठीचे वाचक राजेश राऊत यांनी.

Image copyright Facebook

"काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकते मात्र त्यासाठी राहुल गांधीना अध्यक्ष पदावरून हटवले पाहिजे, कारण राहुल गांधींना नरेंद्र मोदींसारखा प्रचार करता येत नाही," असं मत अभय सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

कर्नाटकमध्ये धर्माच्या राजकारणाच्या चर्चाही रंगल्या. स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला काँग्रेसनं उघड पाठिंबा दिला होता. यावरच नवनाथ लिहतात, "हिंदू धर्मात फूट पाडणं काँग्रेसला महागात पडलं."

Image copyright Facebook

"पृथ्वीवर बसून तुम्ही मंगळ ग्रहावरील यान ऑपरेट करू शकता, तर भाजप आयटी सेलमध्ये बसून वोटिंग मशीनमध्ये का गडबड करू शकत नाही?" असं ट्वीट केलं आहे संदीप पवार यांनी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)