बीबीसी मराठी राउंड-अप

निपाह

फोटो स्रोत, Getty Images

1. निपाह व्हायरसचा धोका

केरळमध्ये निपाह नावाच्या एका जीवघेण्या व्हायरसनं आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला आहे. केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

केरळच्या कोझिकोड शहरात इंफेक्शनची लागण झालेल्या अन्य 25 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

सध्या या निपाह व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 70 टक्के असते. अधिक वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फोटो स्रोत, BBC/PRASHANT NANAWARE

2. फेरीवाल्याच्या हत्येला जबाबदार कोण?

मुंबई महापालिकेच्या सततच्या कारवाईमुळे आणि राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या भीतीमुळे मलंग शेख नावाच्या फेरीवाल्यानं आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सततच्या कारवाईमुळे त्यांचा व्यवसाय बंद पडायला आला होता.

गेले चार-पाच महिने मलंग तणावाखाली होते. अखेर त्यांनी गुरुवार 10 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार आहे, हा प्रश्न आता दादरच्या फेरीवाल्यांना पडला आहे. याच संदर्भाताला बीबीसी मराठीचा ग्राउंड रिपोर्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

फोटो स्रोत, लौकिक शिलकर

फोटो कॅप्शन,

भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 'तारिणी' च्या पथकाचं स्वागत केलं.

3. समुद्रकन्या पृथ्वी प्रदक्षिणा करून परतल्या

ऑक्टोबर 2017मध्ये गोव्याहून निघालेल्या 6 महिला नौदल अधिकारी पृथ्वी प्रदक्षिणा करून परतल्या आहेत. या टीमनं 28 हजार सागरी मैलांचं अंतर पार केलं. गोव्यातल्या INS मांडवी या नौदलाच्या तळावर सोमवारी त्या दाखल झाल्या.

INSV तारिणी या 14.4 मीटर लांबीच्या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या बोटीतून त्यांनी हा प्रवास केला.

या शूरवीर 6 सागरीकन्यांची प्रेरणादायी स्टोरी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फोटो स्रोत, Prakash Mathema / Getty Images

फोटो कॅप्शन,

शिया बोयी

4. दोन्ही पाय नसताना केलं एव्हरेस्ट सर

1975 मध्ये एव्हरेस्ट शिखराजवळ गिर्यारोहण करताना शिया बोयू यांच्या पायांना हिमबाधा (Frostbite) झाली. त्यामुळे त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले.

वादळाचा तडाखा त्यांच्या जिद्दीला खीळ घालू शकला नाही. अखेर वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट सर केलं!

पण यासाठी त्यांना मोठी तयारी करावी लागली. फक्त एव्हरेस्टच नाही तर शिया यांनी जगातली टॉपची 7 शिखरं सर केली आहेत. कुठून आणि कशी त्यांनी ही शक्ती मिळवली? सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

फोटो स्रोत, Getty Images

5. इराणकडून निर्बंधांचा तीव्र निषेध

अमेरिका इराणवर आतापर्यंतचे सर्वांत कठोर निर्बंध लादणार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांनी स्पष्ट केलं आहे. ज्याचा इराणनं तीव्र निषेध केला आहे.

"अमेरिका स्वतःच्याच फसलेल्या धोरणांची बळी ठरली आहे, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील," असा इशारा यावर प्रत्युत्तर देताना इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झरीफ यांनी दिला आहे.

तर अमेरिकेच्या या निर्बंधांनंतर इराणला आपली अर्थव्यवस्था तारणं खूप कठीण जाईल, असं पॉम्पेओ यांनी म्हटलं आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)