बीबीसी मराठीचा सकाळचा राउंड अप - बुधवार

Image copyright Facebook/Kumarswamy

1. कुमारस्वामी यांचा आज शपथविधी

कर्नाटकची राजधानी बंळगुरूमध्ये आज HD कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी होणार आहे. दुपारी साडेचार वाजता हा सोहळा होईल. यावेळी जेडीएसचे 12 तर काँग्रेसचे 22 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. काँग्रेसकडून जी. परमेश्वर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

या कार्यक्रमाला देशातल्या 12 विरोधीपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात सोनिया गांधीसमवेत मायावती आणि मतता बॅनर्जी देखील उपस्थित राहणार आहेत.

कर्नाटकातल्या जेडीएस आणि काँग्रेस युतीच्या भविष्याचं विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रतिमा मथळा स्टरलाईट कंपनीवरून पेटलेलं आंदोलन

2. तामिळनाडूत स्टरलाइटविरोधात आंदोलन, 9 ठार

तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागात स्टरलाइट लिमिटेड कंपनीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

तामिळनाडूच्या तुतीकोरीन भागातल्या स्टरलाइट लिमिटेड कंपनीच्या विस्ताराला नागरिकांचा विरोध आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

3. शहरांमध्ये पाणी टंचाई

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांच्या भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे. खास करून गरीब वस्त्यांमध्ये ही परिस्थिती दिसून येत आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्यानं लोकांना कामधंदा सोडून पाणी भरावं लागत आहे. जलना, परभणी, यवतमाळ, सोलापूर आणि मनमाड या शहरातल्या परिस्थितीचा बीबीसी मराठीच्या टीमनं आढावा घेतला.

बीबीसी मराठीचा पाणी टंचाईचा ग्राउंड रिपोर्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Image copyright Facebook/RajThackeray

4. राज ठाकरेंसाठी आता राहुल गांधी हिरो?

कर्नाटक विधानसभा निकालांनंतर राज ठाकरे यांनी नवं कार्टून प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी राहुल गांधींना सकारात्मक आणि अमित शहांना नकारात्मक दाखवलं आहे.

काँग्रेसविरोधी राजकारण करणाऱ्या शिवसेनेत राज ठाकरे लहानाचे मोठे झाले. एके काळी नरेंद्र मोदींचं गुणगान करणारे राज आता राहुल गांधींना हिरोच्या भूमिकेत दाखवत आहेत. हा त्यांनी घेतलेला यूटर्न आहे का?

याबाबत मनसेची अधिकृत भूमिका काय? भविष्यात ते काँग्रेसबरोबर जाणार का? याबाबतचं सविस्तर विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Image copyright Reuters

5. ट्रंप-किम चर्चा लांबणीवर?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्यातली 12 जूनला होणारी बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. खुद्द डोनाल्ड ट्रंप यांनी तसे संकेत दिले आहेत.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर ट्रंप यांनी हे संकेत दिले आहेत. .या बैठकीसाठी ठरलेल्या अटींचं उत्तर कोरियानं पालन करावं असं, ट्रंप यांनी म्हटलं आहे. या संदर्भातलं अधिक वृत्त जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)