सोशल : 'आजी-आजोबा स्वतःला सांभाळू शकत नसतील तर नातवंड सांभाळण्याची सक्ती नको'

नातवंडांचा सांभाळ जबाबदारी की सक्ती?
फोटो कॅप्शन,

नातवंडांचा सांभाळ जबाबदारी की सक्ती?

"नातवंडांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबांवर दबाव टाकता येणार नाही," असं पुण्यातील एका फॅमिली कोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलंय.

"नातवंडाना मार्गदर्शन करणं, चुका सांगणं, पालन, पोषणात मदत करणं याला आजी-आजोबांची जबाबदारी म्हणता येईलही, पण त्यांचा सांभाळ करणं ही पूर्णत: आई-वडिलांचीच जबाबदारी आहे," असंही कोर्टाने पुढे म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना कोर्टाच्या या निर्णयाविषयी त्यांची मतं विचारली होती.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्यात, त्यातल्याच या निवडक प्रतिक्रिया.

त्रिशिला लोंढे म्हणतात, "आजी आजोबा हे आपल्या नातवडांवर खूप प्रेम करतात. ते त्यांच्या प्रेमापोटी तो अपमानसुद्धा सहन करतात. पण तेच जर स्वतःला व्यवस्थित सांभाळू शकत नसतील तर त्यांच्यावर नातवंड सांभाळण्याची सक्ती करू नये."

"जबाबदारी शब्द आला की जबरदस्ती झालीच. स्वतःची नातवंड सांभाळणं यात कसली जबाबदारी? मग उद्या सुनेने सासू सासऱ्यांना सांभाळणं ही सुनेची जबाबदारी नाही, असं कोर्टाने सांगितलं तर पुन्हा नियम बदलणार," असं म्हटलं आहे नीता भुसारी यांनी.

पण संध्या सहस्त्रबुद्धे यांचं मत थोडं वेगळं आहे. त्या म्हणतात, "नातवंडाना सांभाळणं हा आजी आजोबांचा आनंद आहे."

अक्षय आल्ते म्हणतात, "जबाबदारी ही एखाद्यावर लादली की जबाबदारी रहात नाही. म्हणून स्वखुशीने जो जे-जे काही स्वीकारतो त्याला ते स्वीकारू द्यावं. आणि तेच आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी लागू व्हावं."

गौरी चौधरी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. "सहसा आजी आजोबा नातवंडांच्या बाबतीत प्रेमळ असतात. (अर्थात काही दुर्मिळ अपवाद आहेत) तरीही जर त्यांनी ही जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली तर ठीक अन्यथा ती लादण्यात येऊ नये."

"आपापसातील सामंजस्य महत्त्वाचे आहे. काही कारणांनी त्यांना जमत नसेल तर त्यांचा आदर करण्यातच हित आहे. कोणीही टोकाची भूमिका न घेणे श्रेयस्कर," असंही त्या पुढे म्हणतात.

प्रवीण भोसले यांनी वेगळंच मत मांडलं आहे. ते लिहितात, "(आजी आजोबांना) कोण सांगतंय सांभाळायला? आम्ही जन्म दिला आहे तर आम्ही सांभाळू ना. आम्हाला तरी कोणत्या आजी आजोबांनी सांभाळलं आहे? नाण्याची दुसरी बाजूही बघा."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)