बीबीसी मराठी राउंड अप - गुरुवार

Image copyright @INCINDIA

1. मोदी विरोधकांची एकजूट?

कर्नाटकमध्ये बुधवारी HD कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला. या कार्यक्रमाला तब्बल 12 विरोधीपक्षांचे नेते हजर होते. कधीकाळी काँग्रेसचे कट्टर विरोधक असलेले अरविंद केजरीवाल, मायावती आणि सीताराम येचुरी या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर दिसले.

विरोधकांच्या या एकजुटीचा नेमका अर्थ काय? विरोधकांच्या या एकजुटीचा 2019च्या निवडणुकांमध्ये काही परिणाम दिसून येईल याचं विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Image copyright Getty Images

2. ट्रंप यांच्या भेटीसाठी पैसे?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरशेनको आणि डोनाल्ड ट्रंप यांची भेट घडवून आणण्यासाठी ट्रंप यांच्या खासगी वकिलांनी पैसे घेतल्याची माहिती सुत्रांनी बीबीसीला दिली आहे.

ट्रंप यांचे वकील मायकेल कोहेन यांनी 400,000 डॉ़लर्स इतकी रक्कम घेतल्याची माहिती युक्रेनची राजधानी काईव मधल्या सुत्रांनी दिली आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरशेनको यांच्यासाठी काम करणाऱ्या एका मध्यस्थानं हा व्यवहार घडवून आणला असं सुत्रांचं म्हणणं आहे. कोहेन यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

3. एबीडीची निवृत्ती

'एबीडी' अर्थात अब्राहम बेंजामिन डी'व्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. ट्विटरवर एक व्हीडिओ जारी करून त्यानं हा निर्णय कळवला आहे. त्यांचा चाहत्यांना मात्र या निर्णयामुळे धक्का बसला आहे.

डी'व्हिलियर्सची कारकीर्द आणि अष्टपैलू खेळीचं विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माड्युरो

4. व्हेनेझुएलात महानाट्य

व्हेनेझुएलातली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो यांनी नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यामुळे आणखी सहा वर्षं सत्तेत राहण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला.

पण विरोधकांनी मात्र या निवडणुकीत घातलेला बहिष्कार आणि मतदाना दरम्यान झालेल्या कथित गडबडीमुळे या निवडणुका जागतिक पातळीवर गाजत आहेत.

एवढंच काय तर माडुरोंच्या निवडीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची व्हेनेझुएलावर खप्पा मर्जी झाली आहे. नेमकं काय सुरू आहे व्हेनेझुएलात हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रियंका चोपडाने बांगलादेशच्या कॉक्स बाझार शहरात रोहिंग्यांच्या एका कँपला भेट दिली.

5. प्रियंका चोप्रावर का चिडले लोक?

UNICEFची सदिच्छा दूत असलेल्या प्रियंकानं सोमवारी बांगलादेशच्या कॉक्स बाझार शहरात रोहिंग्यांच्या एका शरणार्थी शिबिराला भेट दिली. पण तिच्या या भेटीमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

कुणी तिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहे तर कुणी तिनं कधी काश्मिरी पंडितांची भेट का घेतली नाही, असा सवाल केला आहे.

तर काही चाहत्यांनी मात्र तिची प्रशंसा सुद्धा केली आहे. प्रियंकाचे चाहते आणि तिला ट्रेल करणारे लोक नक्की काय बोलत आहेत हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या