सोशल : 'मोदीजी, माझे 15 लाख कधी येणार?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

26 मे 2014 या दिवशी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात सत्तेत आलं. आज मोदी सरकारला 4 वर्षं पूर्ण झाली आहेत.

त्यानिमित्त 'पंतप्रधान मोदी आज तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांना काय सांगाल?' असा प्रश्न आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारला होता.

यावर आलेल्या वाचकांच्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे:

1. विक्रांत कदम - "मोदी साहेब, एवढा कॉन्फिडेन्शिअल विकास जो कुणालाच दिसत नाही, जाणवत नाही याची ट्रेनिंग नेमकं घेतलं कुठे?"

2. अतुल साळवे - तुम्ही भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहात, या पदाचा मान राखा आणि तसं काम करा. नुसता विरोधकांचा उपहास करणं म्हणजे विकास नव्हे.

3. प्रमोद सोनुने - कामं करत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत.

4. सुनील गणलेवार - मोदीजी, मागील सरकारांनी काहीच केलं नाही, अशी टीका करू नका. तशी टीका म्हणजे शास्त्रज्ञ, जवान आणि शेतकऱ्यांचा अपमान असतो.

5. अजिंक्य पगारे- फेकू नका राव मोदीजी. सकाळी उठल्यापासून टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया सगळीकडेच शेठ दिसतात.

फोटो स्रोत, AFP

6. विजय भोरखाडे- काळे धन कधी येणार?

7. रवींद्र जोशी- छान काम सुरू आहे. पेट्रोलला जीएसटीमध्ये आणा.

8. किरण पाटील राजपूत- तुमचा खरा मुखवटा कोणता? आरएसएस, इंण्डस्ट्री लॉबी की स्वत:ची?

9. रवि घाडी- इथे भेटलात वर भेटू नका.

10. ललित वानखेडे- तुम्ही खूप काम केलं आहे, आता रिटायर व्हायची वेळ आली आहे.

11. अनघा पोतदार- वैद्यकीय सुविधा योग्य दरात उपलब्ध करून द्या.

12. चंद्रशेखर बोंद्रे - सर्व आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करून शेतकऱ्यांना पेन्शन चालू करा.

फोटो स्रोत, AFP

13. प्रतीक थोरात - आरक्षण बंद करा.

14. जय राजे शेलार- माझे 15 लाख कधी येणार?

15. सचिन शिलावंत - देशातलं तुमचं दुकान कायमचं बंद करा

16. दया पवार - आयटी सेल मोठा की तुम्ही?

17. विनोद किरडक - साहेब, 1 वर्षं राहिलं. काही देश फिरायचे बाकी असतील तर फिरून घ्या.

18. रविकिरण सावे - धन्यवाद.

19. वासुदेव नारखेडे - कीप इट अप, मोदीजी.

20. अभिनंदन मगदुम- कृषी क्षेत्र आणि रोजगारनिर्मिती याकडे लक्ष द्या.

फोटो स्रोत, AFP

21. तुषार थोरात पाटील- यू आर माय फ्युचर!

22. प्रताप देशमुख - जय महाराष्ट्र

23. किरण पवार - समोर जात राहा. आम्हाला आपला अभिमान आहे.

24. संकेत बेकळे - फसलो बाबा आम्ही, तुम्हाला निवडून देऊन.

25. भाई वाघमारे- रडायची अक्टिंग कुठे शिकलात?

26. संतोष पुंडलिक जाधव- पहिले अच्छे दिन, सब का साथ, सब का विकास अन् आता साफ नियत, सही विकास. नुसता शब्द बदल बाकी काही नाही. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काम काहीच केलं नाही.

27. राज भालेराव- संन्यास घ्या.

28. विशाल माळई- मोदी साहेब, जुमलेबाजी बंक करा.

29. गोविंद गडियार - सुट्टी घ्या.

30. इम्तियाज अहमद - भारताची एकता, बंधुता आणि संपनतेसाठी काहीतरी करा.

फोटो स्रोत, AFP

31. अनंत लभडे - विकास वेडा झालाय.

32. महेश पद्मिनी सुहास लंकेश्वर- सत्तेचा उपयोग सामान्य लोकांसाठी करता आला नाही तुम्हाला

33. तुषार जाधव - खरं कधीपासून बोलणार?

34. धीरज ठाकरे- शेतीमालाला भाव दिल्याबद्दल अभिनंदन

35. मिलिंद अष्टापुरे- मी तुमच्यासोबत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)