भारतीय स्त्रीच्या मृत्युनंतर आयर्लंडमध्ये क्रांती : बीबीसी मराठी रविवारचा राउंड अप

आयर्लंड

1. सविताच्या मृत्युनंतर आयर्लंडमध्ये क्रांती : गर्भपाताला मिळाली परवानगी

आयर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतात गर्भपातावरील बंदी उठवण्याचा अभूतपूर्व निर्णय झाला आहे. आयरिश सरकारनं घेतलेल्या सार्वमतात या कायद्यात बदल करण्याचा कौल आयरिश जनतेनं दिला.

कायद्यातील एका कलमामुळे गर्भपात होऊ न शकलेल्या भारतीय वंशाच्या सविता हलप्पनावर यांचा मृत्यू आयर्लंडमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर गर्भपातावरील बंदी हटवण्याच्या आंदोलनानं वेग घेतला. आजच्या निकालानं या आंदोलनाचा समारोप झाला आहे. बीबीसी मराठीनं सविता यांच्या कर्नाटकात राहणाऱ्या आई- वडिलांशी बातचीत केली. त्याविषयी सविस्तर बातमी वाचा.

2. दिल्लीची मेघना CBSE टॉपर, 500 पैकी 499 मार्क

CBSE च्या बारावी परीक्षेचे निकाल काल जाहीर झाले असून नोएडातील विद्यार्थिनी मेघना श्रीवास्तवनं 500 पैकी 499 गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. मेघना ह्युमॅनिटीज शाखेची विद्यार्थिनी असून 5 पैकी 4 विषयात तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. फक्त इंग्रजीत एक मार्क कमी मिळा आहे. बीबीसी हिंदीशी बोलताना मेघना म्हणाली, मला टॉपर असल्याचं मला माहितीच नव्हतं. मित्रांनी न्यूज फ्लॅशचे स्क्रीनशॉट पाठवले तेव्हा मला कळलं आणि प्रचंड आनंद झाला." मेघनानं बीबीसी हिंदीला यशाचं रहस्यही सांगितलं. ते वाचण्यासाठी बीबीसी हिंदीच्या या लिंकवर क्लिक करा.

3. किम आणि मून अचानक भेटले

उत्तर कोरिया आणि अमेरिकेत चर्चा व्हावी यासाठी उत्तर कोरिया उत्सुक असल्याचा बातम्या अमेरिकन मीडियानं दिल्या आहेत. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी शनिवारी अचनाक दक्षिण कोरियाचे नेते मून जे यांची भेट घेतली. गेल्या चार आठवड्यातली ही दोन नेत्यांमधली दुसरी भेट आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 12 जूनला होणारी किम यांच्याबरोबरची भेट अचानक रद्द केल्याचं जाहीर केल्यानं खळबळ उडाली होती. दुसऱ्या दिवशी परत ही भेट होऊ शकते असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं होतं. या सगळ्या दरम्यान दक्षिण आणि उत्तर कोरियांच्या नेत्यांची भेट महत्त्वाची ठरणारी असल्याचं सांगण्यात येत आहे. सविस्तर बातमी आणि अपडेट्स बीबीसीच्या या लिंकवर वाचू शकता.

4. IPLचा थरार शेवटच्या टप्प्यात

फोटो कॅप्शन,

आपला परफॉर्मन्स सादर करताना चीअरलीडर्स

IPL अर्थात इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना रविवारी संध्याकाळी हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दरम्यान होणार आहे. या सीझनमध्ये या दोन टीम दुसऱ्यांना समोरासमोर येणार आहेत. यापूर्वी क्वालिफायर वन स्पर्धेत चेन्नईनं हैदराबादला हरवलं होतं. आज या सीझनचा विजेता संघ ठरणार आहे. दरम्यान हैदराबाद संघातला राशीद खान त्यांच्या सेमी फायनलमधल्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याविषयीची बातमी इथे वाचा. IPL दरम्यान खेळाबरोबर चर्चा असते चिअरलीडर्सची. या चिअरलीडर्स भारतीय क्रिकेटमध्ये कशा आल्या हे वाचण्यासाठी क्लिक करा.

5. मुस्लीम युवकाला वाचवणारा शीख पोलीस

गगनदीप सिंग. उत्तराखंडच्या पोलीस दलातले एक सब इनस्पेक्टर. सोशल मीडियावर गगनदीप यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे. एका मुस्लीम मुलाला गगनदीप यांनी समाजकंटकांच्या तावडीतून वाचवलं.

एक मुस्लीम युवक आपल्या हिंदू मैत्रिणीसोबत तिथं बसलेला होता. त्या वेळी हे तथाकथित संस्कृतीरक्षक तिथं आले आणि त्यांनी त्याला धक्काबुक्की सुरू केली.

ते त्याला मारून टाकतील अशीच परिस्थिती होती. पण तितक्यात तिथं गगनदीप आले आणि त्यांनी त्या जमावापासून त्याचं रक्षण केलं. बीबीसी मराठीनं यासंदर्भातला एक लेख प्रसिद्ध केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)