IPL फायनलः धोनी आणि राशीद खान यांच्यातल्या युद्धात कोण जिंकणार?

  • आदेश कुमार गुप्ता
  • क्रीडा पत्रकार, बीबीसीसाठी
क्रिकेट

फोटो स्रोत, AFP/Getty Images

गेल्या मंगळवारी जेव्हा याच IPLच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये 'चेन्नई सुपरकिंग्स'चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा 'सनरायझर्स हैदराबाद'चा राईट आर्म लेग स्पिनर राशीद खान याच्या गुगलीवर बोल्ड झाला तेव्हा अवघ्या स्टेडिअममध्ये शांतता पसरली होती.

प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी साक्षी धोनी हीच्यासाठीही हे धक्कादायकच होतं. धोनी जेव्हा बोल्ड झाला तेव्हा चेन्नईचा स्कोर होता, चार विकेटवर 39 रन.

असं असलं तरी चेन्नईने 140 धावांचं लक्ष्य फॅफ डू प्लेसी याच्या नाबाद 67 धावांच्या मदतीने 19.1 ओव्हरमध्ये 2 विकेट राखून गाठलं.

पहिला क्वॉलिफायर जिंकण्याबरोबरच चेन्नईने फायनलमध्ये स्वतःचं स्थान निश्चित केलं. आता रविवारी त्याच 'सनरायझर्स हैदराबाद'बरोबर अंतिम सामना होणार आहे.

'सनरायझर्स हैदराबाद'ने दूसऱ्या क्वॉलिफायरमध्ये 'कोलकाता नायइ टरायडर्स'ला त्यांच्याच इडन गार्डन मैदानावर 14 रनांनी हरवलं.

या मॅचचा हिरो ठरला तो राशीद खान. आधी तर त्याने नाबाद 34 रन काढून आपल्या टीमचा स्कोर 7 विकेटवर 174 रनपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

राशीद खान

त्यानंतर केवळ 19 रन देत 3 विकेट घेत कोलकाताचं कंबरडंच मोडलं. त्याने दोन शानदार कॅचही घेतले.

स्पिनरविरोधात शानदार बॅटींग करणारा महेंद्रसिंग धोनी यावेळेस राशीद खानला तगडं उत्तर देत आपल्या टीमला तिसऱ्यांदा चँपियन बनवणार का? आता क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या चर्चा आहे, ती याचीच.

दुसरीकडे राशीद खान याच्यावरही अनेकांचं लक्ष लागलं आहे. आपल्या जबरदस्त खेळीद्वारे राशीद 'सनरायझर्स हैदराबाद'ला दुसऱ्यांदा चँपियन बनवणार का?

दोन्ही संघ

'चेन्नई सुपरकिंग्ज'कडे शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसी, सुरेश रैना, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरसारखे धुरंदर बॅटसमन आणि ऑलराउंडर आहेत. पण शेवटी धोनी हा धोनी आहे. त्याला तोड नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

चेन्नई सुपरकिंग्ज

त्याचप्रमाणं 'सनरायझर्स हैदराबाद'कडे कॅप्टन केन विल्यमसन, शिखर धवन, मनीष पांडे, शाकीब अल हसन, युसूफ पठाण, भुवनेश्वर कुमार, ब्रैथवेट आणि सिद्धार्थ कौल सारखे बॅटसमन, बॉलर आणि ऑलराउंडर आहेत.

पण राशीद खान हा फायनलमध्ये हुकुमाचा एक्का ठरू शकतो.

आधी चेन्नईची जमेची बाजू

चेन्नईचा अंबाती रायडू याने एकदा नाबाद राहत एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने 586 रन बनवले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

पण 'चेन्नई सुपरकिंग्स'चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला आऊट करणं म्हणजे दुसऱ्या टीमच्या बॉलरसाठी एक महाअडचण ठरते.

धोनीने आतापर्यंत नऊ वेळेस नाबाद राहत तीन अर्धशतकांच्या मदतीने 455 रन बनवले आहेत. यादरम्यान त्याने 30 षटकारही लगावले आहेत.

अशावेळी फक्त विकेटवर त्याचं उपस्थित राहणं हे टीमसाठी विजयाची गॅरंटी बनते. अपेक्षित नसताना शेन वॉटसनची बॅट पण यावेळेस चालली आहे. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीनं 14 मॅचमध्ये 438 रन बनवलेत.

सदाबहार सुरेश रैना

रैनाने आतापर्यंत चार अर्धशतकच्या मदतीने 413 रन केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सुरेश रैना

बॉलिंगमध्ये शार्दुल ठाकुर याने 12 मॅचमध्ये 15, ब्रावोने 15 मॅचमध्ये 13, दीपक चाहरने 11 मॅचमध्ये 10 आणि रवींद्र जडेजा याने 15 मॅचमध्ये 10 विकेट घेत धोनीला साथ दिली.

दुसरीकडे 'सनरायझर्स हैदराबाद'चा कॅप्टन केन विल्यिमसनने दाखवून दिले की सहजपणे खेळले तरी रन बनवता येतात.

त्याने 16 मॅचमध्ये आठ अर्धशतकांच्या मदतीने आतापर्यंत IPLमध्ये सर्वाधिक 688 रन बनवले आहेत.

'सनरायझर्स हैदराबाद'च्या बहुतांश विजयामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

कुणाला माहित होतं, की न्यूझीलंडचा हा शांत खेळाडू IPLसारख्या टूर्नामेंटमध्येही आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरेल.

फोटो स्रोत, Getty Images

त्याला साथ मिळाली ती शिखर धवनची. ज्याने 15 मॅचमध्ये चार अर्धशतकांच्या मदतीने 471 रन केले.

हैदराबादची जमेची बाजू

विशेष म्हणजे, 'सनरायझर्स हैदराबाद'ने या दोघांच्या जोरावर जेमतेम रन बनवले आणि त्यानंतर बॉलरच्या जोरावर कमी स्कोरच्या मॅचही जिंकल्या.

मनीष पांडेने 15 मॅचमध्ये 284 रन केले. याला फक्त समाधानकारक योगदानच म्हणता येऊ शकेल. 'सनरायझर्स हैदराबाद'ची बॉलिंग यंदाच्या IPLमध्येमत्र चर्चेचा विषय ठरली.

लेग स्पिनर राशीद खानने 16 मॅचमध्ये 21 विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

प्रथम स्थानावर असणाऱ्या पंजाबच्या एंड्रू टाई याने 14 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या.

याशिवाय 'सनरायझर्स हैदराबाद'चाच फास्ट बॉलर सिद्धार्थ कौल याने जबरदस्त स्विंग आणि यॉर्कर बॉलच्या बदल्यात 16 मॅचमध्ये 21 खेळाडू तंबूत पाठवले.

राशीद विरुद्ध धोनी

राशीद खान आणि सिद्धार्थ कौल यांच्यातली जुगलबंदी विरोधी संघावर भारी पडली.

फोटो स्रोत, Getty Images

या जोडीने मोक्याच्या वेळी विकेट घेतल्या.

तिथंच शाकीब अल हसन याने पण 14 आणि संदीप शर्माने 11 विकेट घेत त्यांना साथ दिली. राहिलेली कसर भुवनेश्वर कुमारने नऊ विकेट घेत भरुन काढली.

रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये चेन्नईची बॅटिंग आणि हैदराबादची बॉलिंग यावर तर या संघांची भिस्त नसेल ना?

हा एक प्रश्न आहे. क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली यांना वाटतं की, "मागच्या मॅचमध्ये धोनी हा राशीदच्या गुगलीवर बोल्ड जरी झाला असला तरी यावेळेस तसंच काही घडेल असा त्याचा अर्थ होत नाही."

फायनल ही चेन्नईची बॅटिंग आणि हैदराबादची बॉलिंग यांच्यातच असेल हे मात्र खरं असू शकतं, असं विजय लोकपल्ली मानतात. यावरही असं वाटतं की धोनीने कदाचित फायनलसाठी काहीतरी राखून ठेवलेलं असावं.

बॉल आणि बॅटचा संघर्ष

राशीद खान याने जरी आपल्या टीमसाठी सर्वाधिक विकेट घेतल्या असल्या तरी भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्माने दबाव निर्माण केल्याचा फायदा राशीद आणि सिद्धार्थ कौल यांना मिळाला.

फोटो स्रोत, Getty Images

विजय लोकपल्ली म्हणतात, "असं असलं तरी राशीद खानचं कौतुक आपल्याला केलंच पाहिजे. कारण आपल्या बॉलिंगच्या चिंधड्या उडू शकतात याची भीती त्याला वाटत नाही. तो एक धैर्यशील बॉलर आहे. प्रत्येकवेळेस विकेट घ्यायचा प्रयत्न करत असतो. अफगाणिस्तानमधील सद्यपरिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. तिथून येऊन IPLमध्ये चमकदार कामगिरी करणं हे सोपं नाही."

तसं तर चेन्नईची टीम दोन वर्षांनंतर IPLमध्ये परतली आहे. अशावेळी धोनी या टीमला तिसऱ्यांदा चॅंपियन बनवण्यात कुठलीही कसर ठेवणार नाही.

दुसरीकडे विजय लोकपल्ली यांच म्हणणं आहे की, चेन्नईनं IPLच्या इतिहासात यावेळेस सर्वांत चांगली बॅटिंग केली आहे. त्यांनी हैदराबादला हरवलंही आहे. त्याचवेळी हैदराबाद पण तिसऱ्यावेळेस चेन्नईला चँपियन बनण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेलच. हैदराबादने IPLमध्ये सगळ्यात चांगली बॉलिंग केली आहे. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष असेल. यापेक्षा चांगली फायनलची अपेक्षा करू शकत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)