पालघर पोटनिवडणूक : 'लोकांच्या मताला किंमत नसेल तर, ते फक्त शक्तिप्रदर्शन असेल'

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस Image copyright Twitter
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

शिवसेना, भाजपने प्रतिष्ठेची केलेली पालघर लोकसभा पोटनिवडणूक आज पार पडली. सोमवारी देशातल्या सगळ्या पोटनिवडणुकांसाठी मतदान झालं.

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना 'साम-दाम-दंड-भेदा'चा वापर करण्याविषयी सांगितलं, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी एका प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिपही जाहीर केली.

त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी बोललो ती वाक्यं अर्धवट वापरून शिवसेनेनं क्लिप बनवली. संपूर्ण क्लिप ऐकवलीच नाही."

साम, दाम, दंड, भेद नीतीवरून रंगलेल्या पालघर-गोंदियाच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांची मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्याच या निवडक प्रतिक्रिया.

जयमाला धंकिकर लिहितात, 'लोकशाही देशात निवडणुकीत 'साम, दाम, दंड, भेद' हे चारही दूर ठेवून लोकांना मतदान स्वातंत्र्य देणं जास्त गरजेचं आहे. जर अशा प्रकारच्या विचारांवर निवडणुका होणार असतील तर लोकशाही संपली म्हणून घोषित करायला पाहिजे.'

Image copyright Facebook

लोकांच्या मताला किंमत नसेल तर, ती निवडणूक नाही तर फक्त शक्ती प्रदर्शन असेल, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

'उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हुशार अॅक्टर आहेत. जनतेला भाडणं दखवायची आणि आतून सेटिंग करून चांगलं राहायचं', असं मत धीरज बेळे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

गेल्या चार वर्षांत या दोघांनी किती कामे केली आहेत? असा प्रश्नही त्यांनी पुढे विचारला आहे.

Image copyright Facebook

शिला कोकाटे म्हणतात, आरोप करणारे स्वत: किती पाण्यात आहेत ते एकदा पाहावं.

Image copyright Samruddha

तर प्रसाद चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. ते म्हणतात, "समोर उभा राहतो तो शत्रू असतो. पण आपल्याच घरात राहून पाठीत खंजीर खुपसला जात असेल तर मग साम दाम दंड भेद तर होणारच."

Image copyright Facebook

सुनील सक्रू यांनी साम दाम दंड भेद म्हणजेच सम समान पैसे वाटाप असल्याचं म्हटलं आहे. बाबा अकडे यांनी शिवसेना आणि भाजप या दोघांवरही टीका केली आहे.

Image copyright Facebook

"दोन्ही पक्ष लोकशाही आणि लोकांच्या हितासाठी न काम करता, साम-दाम-दंड-भेदही नीतीचा वापरतात. फक्त दाखवायला वेगळे पक्ष आहेत. परंतु, प्रचारात मुख्य लढत शिवसेना आणि भाजपमध्येच आहे.

'विरोधी असल्याचं नुसतं चित्रं भासवून दोनच पर्याय जनतेसमोर आहेत, अशा बुद्धिभेद केला जातो आणि ऐन वेळी यांची युती होते. त्यामुळेच दोन्ही पक्ष साम-दाम-दंड-भेद यावर जोर देतात', अशी प्रतिक्रिया बाबा अकडे यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)