पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदानयंत्र उन्हामुळे बिघाड? बीबीसी मराठीचा मंगळवारचा राउंड-अप

1. मतदान यंत्रात उन्हामुळे बिघाड?

उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं

सोमवारी पार पडलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया खोळंबली.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही कारण जवळपास 25 टक्के EVM आणि VVPAT यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं. उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये छापून आल्या आहेत.

पालघरमध्येही काही मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचा आरोप मात्र निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.

या घटनेवरून अनेकांनी मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बिघाड झालेल्या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची आणि मतमोजणीवेळी VVPAT स्लीपची मोजणी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणही तापलं असून, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढले आहेत. वाचा कोण काय म्हणालं आणि त्यावर बीबीसी मराठीचे वाचक काय म्हणाले.

Image copyright RATNAGIRI BACHAV SANGHARSH SAMITI
प्रतिमा मथळा सर्वसामान्य कोकणवासीयसुद्धा यात हिरिरीनं सहभागी झाली होता.

2. तामिळनाडूत स्टरलाईटला लागणार टाळं

तामिळनाडूतल्या स्टरलाईट लिमिटेड कंपनीविरोधात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून 13 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तामिळनाडू सरकारने तुतिकोरीनमधील कंपनीचं काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

शंभरहून अधिक दिवस झालेल्या आंदोलनानंतर हा निर्णय सरकारने दिला आहे.

पण बीबीसीने मिळवलेल्या माहितीनुसार हा कॉपर स्मेल्टिंग प्रकल्प 90च्या दशकात सुरुवातीला रत्नागिरीमध्ये होणार होता. पण स्थानिकांनी दिलेल्या लढ्यामुळे तो कसा तामिळनाडूत गेला. वाचा पूर्ण बातमी इथे

3. 'आता आमच्या सविताच्या आतम्याला शांती मिळेल'

Image copyright Swati Patil-Rajgolkar

आयर्लंडमध्ये झालेल्या सार्वमतात गर्भपात कायद्यात बदल करण्याच्या बाजूनं 66 टक्के नागरिकांनी कौल दिला आणि सार्वमतात गर्भपातावरील बंदी उठवण्याचा अभूतपूर्व निर्णय झाला. या क्रांतीला निमित्त ठरला तो मूळच्या भारतीय सविता हलप्पनावार यांचा मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष.

आयर्लंडमधील कायद्यामुळे सविता यांना गर्भपात करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती, ज्यामुळे त्यांचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर गर्भपातावरील बंदी हटवण्याच्या आंदोलनानं वेग घेतला. आणि त्यातून सार्वमत चाचणीचा पर्याय सुरू झाला.

शुक्रवारी झालेल्या सार्वमत चाचणीच्या निकालानंतर बीबीसी मराठीशी बोलताना सविताच्या बेळगावस्थित पालकांनी सांगितलं, "आमच्या संघर्षाला आता फळ मिळालं आहे. आमच्या सविताच्या आत्म्याला आता शांती मिळेल."

वाचा पूर्ण बातमी इथे

4. ...अन् तो स्पायडरमॅन झाला

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मामादू यांची एलसी पॅलेस येथे भेट घेतली

पॅरिसमध्ये एका उंच इमारतीतून पडलेल्या लहान मुलाला वाचवण्यासाठी मालीचा एक स्थलांतरित स्पायडरमनसारखा चढून आला. आणि त्याने त्या मुलाला वाचवलं.

चार वर्षांचा तो लहान मुलगा पडला होता आणि बालकनीतून लटकत होता. तेवढ्यात त्याला वाचवण्यासाठी मालीच्या मामादू गासामा यांनी जीवाची पर्वा न करता खालून वर बालकनीतून चढायला सुरुवात केली. त्यांच्या या साहसाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हा प्रसंग याचि देही याचि डोळा अनुभवणाऱ्या उपस्थितांनी मामादूंचे टाळ्या वाजवून कौतुक केलं.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मामादू यांची एलसी पॅलेस येथे भेट घेतली आणि मामादू यांना फ्रेंच नागरिकत्व देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

वाचा पूर्ण बातमी बीबीसी वर्ल्डवर

5. मतं खरेदी करून निवडणुका जिंकता येतात का?

Image copyright AFP
प्रतिमा मथळा मतदान

पालघर पोटनिवडणुकीसाठी मतदारांना पैसे दिले जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याआधीही भारतात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे आरोप झाले आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी अनेकदा नेते मंडळी आणि कार्यकर्ते मतदारांमध्ये साहित्य-सामुग्री वाटप करताना दिसतात, कधी पैसा तर कधी दारूही.

अनेकदा निवडणुकांच्या ऐन तोंडावर धाडी टाकून असा मुद्देमाल जप्त केला जातो. पण खरंच अशा खैरातीचा मतदारांच्या मतांवर परिणाम होतो का? खरंच मतं खरेदी करता येतात का? आणि अशी मतं खरेदी करून निवडणुका जिंकता येतात का?

वाचा हे विश्लेषण.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)