वीरे दी वेडिंग : त्या हस्तमैथुनाविषयी बोलल्या पण...

'वीरे दी वेडिंग' Image copyright VDWTheFilm/Facebook

कशा असतात फेमिनिस्ट मुली? या प्रश्नाची दोन उत्तरं असू शकतात.

सर्वमान्य समजूत अशी की, या मुली छोटे कपडे घालतात, दारू-सिगरेट पितात, रात्र रात्र पार्ट्या करतात.

या मुली 'अव्हेलेबल' असतात, कोणत्याही बंधनाशिवाय शारीरिक संबंध ठेवायला त्यांना काहीही अडचण नसते. आणि या मुली मुलांना स्वतःपेक्षा कमी लेखत नाही.

समानतेच्या नावाखाली या मुली ते सगळं करायचा हट्ट धरतात जे मुलं करतात. उदाहरणार्थ, शिवीगाळ करणं किंवा समोरच्याला एक 'उपभोग्य वस्तू' म्हणून पाहाणं.

दुसरी एक समजूत फारशी प्रचलित नाही, पण तो फेमिनिझमचा खरा अर्थ आहे. तो कोणता, हे नंतर सांगते.

उपरोक्त सर्वमान्य समजूत जास्त प्रचलित आहे, आणि म्हणूनच बऱ्याच महिला आणि पुरुषही स्वतःला फेमिनिस्ट म्हणवून घ्यायला कचरतात.

'वीरे दी वेडिंग'च्या अभिनेत्रींनीसुद्धा मीडियाशी बोलताना हेच स्पष्ट केलं होतं की, या सिनेमात चार स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांची कथा असली तरी हा काही 'फेमिनिस्ट' मूव्ही नाही.

फेमिनिस्ट असणं म्हणजे काहीतरी वाईट, हिडीस, मॉडर्न असण्याचं ओंगळवाणं प्रदर्शन, अशा प्रचलित व्याख्येमुळेच कदाचित हा सिनेमा बनवणाऱ्यांना आणि त्यात काम करणाऱ्यांनाही याला 'फेमिनिस्ट' असं लेबल लावायचं नसेल.

Image copyright VDWTheFilm/Facebook

तथापि, 'वीरे दी वेडिंग' या सिनेमात चारही मुलींची छोटे कपडे घालतात, दारू-सिगरेट पितात आणि रात्रभर पार्ट्या करतात. त्यातल्या एकीला एक माणूस 'अव्हेलेबल' समजतो, दारूच्या नशेत त्यांचे शरीरसंबंधही होतात. त्यानंतरही ही बाई स्वतःला त्या माणसापेक्षा वरचढ समजते.

शिव्यांची तर ओव्या-अभंगांसारखी पखरण आहे यात. गंमत म्हणजे सगळ्या शिव्या चारही हिरोईन्सच्या तोंडी दिल्यात.

एक हिरोईन चारचौघींमध्ये आपल्या नवऱ्याचं कौतुक त्याच्या सेक्स करण्याच्या क्षमतेवरून करते. म्हणजे सर्वमान्य समजुतींनुसार तर ती 'फेमिनिस्ट' झाली.

Image copyright Getty Images

या सिनेमात दाखवली आहे चार मैत्रिणींची गोष्ट. बॉलिवुडमध्ये कदाचित पहिल्यांदाच पुरुषांच्या दोस्तीवर फोकस न करता, बायकांना मुख्य भूमिकेत घेऊन त्यांच्या मैत्रीच्या नात्याचे पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

म्हणून जेव्हा मी हा मूव्ही पाहायला गेले, तेव्हा वाटलं की बदलत्या जगातल्या बदलत्या स्त्रियांची गोष्ट पाहायला मिळेल... अशी स्त्री जिचं अस्तित्व पुरुषामुळे बनलेलं नाही, जिला प्रेमाबरोबरच स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख हवी आहे.

वाटलं, अशी एक गोष्ट पाहायला मिळेल ज्यात बाईच्या आयुष्याचं एकमेव ध्येय लग्न नाहीये... जिच्या आयुष्यात लग्न आपल्या जागी आहे आणि बाकीची नाती आपल्या जागी. ज्यात मैत्रिणींमध्ये तेवढंच तगडं अंडरस्टँडिंग आहे, जेवढं मित्रांमध्ये असतं.

वेगवेगळ्या स्त्रियांचं आयुष्य एका सूत्रात बांधणारी एक ओळख जी समाज आपल्या 'जेंडर'च्या आधारावर आपल्यावर लादतो. बायकांसाठी ही ओळख म्हणजे लग्न वेळेत करण्याचा दबाव, करियर महत्त्वाचं की आई होणं, यामधला संघर्ष असतो.

खरं तर या सिनेमात ते सगळं असू शकत होतं, पण ती फक्त वरवरची एका गोष्ट बनून राहिली. मोठ्या पडद्यावर दाखवलेल्या गेलेल्या या स्त्रिया 'फेमिनिस्ट' असण्याच्या सर्वमान्य व्याख्येत बसतील अशाच होत्या.

त्या हस्तमैथुनाविषयी पण बोलल्या. 'आपला हात जगन्नाथ' म्हणताना त्यांची जीभ अडखळली नाही. सेक्सच्या गरजांविषयी त्या बिनधास्त होऊन बोलल्या. त्यातली एक तर हस्तमैथुन करतानाही दाखवली. या सीनवरून सोशल मीडियावर ट्रोलिंगही झालं.

पण तरीही हा सिनेमा सामान्य समजुतीची चौकट ओलांडून असामान्य होण्यात अपयशी ठरतो.

मुक्त विचारांच्या 'फेमिनिस्ट' स्त्रिया दारू-सिगरेट-शिवीगाळ यासगळ्यांशिवायही स्वतःची मतं ठामपणे आणि कुठलीही तमा न बाळगता मांडू शकतात.

पुरुषांना मिळणारी प्रत्येक सूट तिला हक्क म्हणून हवी, पण फक्त तेच करणं म्हणजे स्वातंत्र्य असतं, असं नाही.

Image copyright Getty Images

'फेमिनिस्ट' असणं खूप सुंदर आहे. तिला पुरुषांना कमी समजायचं नाहीये किंवा त्यांच्या विरोधातही उभं राहायचं नाहीये. तिला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचंय.

हॉटेलमध्ये स्वतःचं बिल भरण्याचं हट्ट करणं, नोकरी करायची किंवा घर सांभाळायचं, हा निर्णय आपला आपण घेणं, ही भावना खूप सुंदर आहे.

आणि कुणी माझ्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून पाहणार नाही, हा विश्वास मनात असताना छाछुगिरी करणं खूप सुंदर आहे.

Image copyright VDWTheFilm/Facebook

मग तर नक्कीच या 'वेडिंग'मधल्या 'वीरा' बरोबर बोलल्या होत्या, की हा मूव्ही फेमिनिस्ट नाही.

मी वाट पाहातेय एका अशा सिनेमाची ज्यात 'फेमिनिझम'चा खरा अर्थ उलगडून दाखवला असेल आणि जो बनवणाऱ्यांना स्वतःला फेमिनिस्ट म्हणण्यात कोणतीही लाज वाटणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)