प्रणव मुखर्जींनी RSSला दिला विविधतेचा डोस, वाचा 5 महत्त्वाचे मुद्दे

आरएसएस

फोटो स्रोत, RSS

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाऊन उपस्थित स्वयंसेवकांना देशातल्या विविधतेबद्दल सांगितलं. त्यांच्या भाषणातले 5 महत्त्वाचे मुद्दे पाहूयात :

1. देश आणि धर्म

आपली राष्ट्रीय ओळख निर्माण होण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. ती सहवासातून निर्माण झाली आहे. आधुनिक भारताची संकल्पना एका वंश किंवा धर्माला बांधील नाही. आपण 'वसुधैव कुटुंबकम्' या विचारधारेवर विश्वास ठेवतो.

2. विविधतेची शक्ती

गेल्या 5000 वर्षांत आपल्यावर अनेक आक्रमणं झाली, पण आपण सगळ्यांना सामावून घेतलं. हे आपलं वैशिष्ट्य आहे. ही विविधता आपली शक्ती आहे. ती आपण साजरी करायला हवी.

3. एका धर्माचा नाश नाही

भारतात केवळ एक धर्म किंवा संस्कृती नाही. इथे संस्कृतींचा संगम होतो. यामुळे कुणाही एका संस्कृतीचा नाश होत नाही.

4. असहिष्णुतेचा परिणाम

एक विशिष्ट धर्म, अस्मिता किंवा द्वेष आणि असहिष्णुतेच्या आधारावर राष्ट्रीयत्वाची व्याख्या करायचा प्रयत्न केला तर त्यामुळे आपल्या ओळख कमजोर होईल. द्वेषामुळे आपली ओळख धोक्यात येऊ शकते.

5. संवाद महत्त्वाचा

लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. आपल्यात मतभेद असू शकतात, पण संवाद सुरू रहायला हवा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)